Ad will apear here
Next
श्रीरंग
हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी

‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कवितामध्ये आज कवी वसंत सावंत यांची ‘श्रीरंग’ ही कविता...
............
दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग 
उधळित पिंजर तरल धुक्याची...झाडांवरती रंग

सूर्यबिंब झाकले ढगांनी झरझरतो पाऊस
किरणांच्या छायेत अनामिक कलाबतूंचे भास

उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगांनी
सह्याद्रीला कुणी फाशिले भस्म नवे शैवांनी

हिरव्या शेतांवरी सावळा रंग रुळे आकाशी
तृप्तीच्या पंखात पोपटी तृणपात्यांच्या राशी

सारणीच्या पाण्यात रंगली जळस्वप्नांचीं गाणी
ही सृष्टीची हिरवी गौळण भरली कटिखांद्यांनी

दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग 
उधळित पिंजर तरल धुक्याची...झाडांवरती रंग 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPUBF
Similar Posts
श्रीरंग ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’मध्ये आज कवी वसंत सावंत यांची ‘श्रीरंग’ ही कविता...
कवितांचा श्रावण... श्रावणाच्या कविता! ...आणि म्हणता म्हणता तो आला... शेतशिवाराला चिंब करणारा, झाडा-फुलांना बहरून टाकणारा, पशु-पक्ष्यांना सुखावणारा, मनामनांना फुलवणारा, चित्तवृत्ती उल्हसित करणारा, अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणारा...तो...श्रावण आला... सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे. हे लक्षात
खुळा पाऊस ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’मध्ये आज पाहू या कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर यांची ‘खुळा पाऊस’ ही कविता.
पोया (पोळा) आज श्रावण अमावास्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाभावाच्या असलेल्या बैलांचं पूजन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच पोळा. त्या निमित्ताने आज ‘पोया (पोळा)’ ही बहिणाबाईंची कविता पाहू या आणि ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ या सदराचा समारोप करू या...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language