Ad will apear here
Next
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम
दक्षिण भारतातील सालेम स्टेशनवर असलेली पेड एसी वेटिंग रूम. अशाच पद्धतीने आता नाशिक रोड स्टेशनवरही होणार आहे.

नाशिक रोड :
नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. 

भुसावळ विभागात पेड एसी रूम असलेले नाशिक रोड हे पहिले स्टेशन असेल. दिल्ली, मुंबई, गोवा, नागपूर अशा मोजक्याच स्थानकात अशा पेड वेटिंग रूम्स आहेत. देशातील प्रमुख स्थानकांमध्ये पेड एसी रूम्स सुरू करण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत. 

नाशिक रोड हे एनएसजी टू श्रेणीतील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. येथून दररोज किमान पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये एसी, स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. हे हायप्रोफाइल प्रवासी प्रामुख्याने धार्मिक व निसर्ग पर्यटनासाठी येतात. काही जण कंपनीच्या मीटिंगसाठी येतात. त्यांच्यासाठी ही पेड एसी वेटिंग रूम असणार आहे. 

ही आहेत वैशिष्ट्ये :
ही एसी वेटिंग रूम खासगी तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. रेल्वे केवळ जागा देणार आहे. या रूममध्ये सुमारे पन्नास प्रवासी आराम करू शकतात. त्यांना एसी खोलीमध्ये कॉफी, कँटीन, टीव्ही, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील. ही सुविधा प्रामुख्याने एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या व्हीआयपी व्यक्तींसाठी सुरू करण्यात आली असली, तरी जनरल कोचमधील सामान्य प्रवाशालाही शुल्क देऊन त्याचा आनंद घेता येईल; मात्र गर्दी असेल तर एसी कोचच्या प्रवाशांना प्राधान्य राहील. 

वरच्या मजल्यावर असल्याने ध्वनी, वायू प्रदूषणाचा त्रास कमी राहील. दोन तासांच्या हिशेबाने शुल्क आकारले जाईल. विशेष म्हणजे रेल्वेचा अधिकारी, कर्मचारी आला तरी त्यालाही येथे शुल्क भरावे लागेल. भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी या जागेची पाहणी करून काही सुधारणा सुचवल्या आहेत. 

सध्याची सुविधा
नाशिक रोड रेल्वे स्थानकात विविध स्तरांतील प्रवासी येतात. त्यांनी काढलेल्या तिकिटानुसार वेटिंग रूमची सुविधा आहे. एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी दोन एसी व दोन नॉन एसी रूम्स आहेत. चारपैकी दोन महिलांसाठी आहेत. पुरुषांसाठीच्या वेटिंग रूमची क्षमता तीस प्रवाशांची, तर महिलांसाठीच्या रूम्सची क्षमता अठराची आहे. प्रवेशासाठी कर्मचाऱ्याला तिकीट दाखवावे लागते. येथे मोबाइल चार्जिंग, एसी, स्वच्छतागृह एवढ्याच सुविधा आहेत. पाचवी वेटिंग रूम बुकिंग ऑफिस शेजारील मोकळ्या जागेत आहे. तेथे जनरल बोगीचे तिकीट असणाऱ्यांना आराम करता येतो. त्यांच्यासाठी सिमेंटचे ओटे आहेत. बाकी सुविधा नाहीत. दिवाळी व उन्हाळ्यातच नव्हे, तर अन्य वेळीही वेटिंग रूम्स फुल असतात. त्यामुळे नवीन पेड एसी वेटिंग रूम उपयुक्त ठरणार आहे. स्थानकात दहा एलईडी टीव्ही
या रेल्वे स्थानकातील जुने टीव्ही संच काढण्यात आले असून दहा नवीन एलईडी टीव्ही संच बसविण्यात येणार आहेत. प्लॅटफार्म क्रमांक एकबरोबरच दोन आणि तीनवरही हे संच बसविण्यात येणार असल्याने प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे. मुंबई रेल्वे स्थानकातील टीव्हीप्रमाणे असणाऱ्या या टीव्ही संचांवर सरकारी, तसेच रेल्वेच्या नागरिकांसाठी असलेल्या योजना, स्वच्छता अभियान आदींची माहिती प्रसारित केली जाणार आहे. वीज बचतीसाठी स्थानकात एलईडी दिवे, तसेच इलेक्ट्रॉनिक बोर्ड बसविण्यात आले आहेत. स्थानकात नुकतेच किड्स पार्क सुरू झाले असून आता ऑक्सिजन पार्क, पार्लर, पॅथॉलाजी लॅब, पोर्टेबल मोबाइल चार्जर मशिन, बॅटरीवरील लगेज गाड्या आदींचेही नियोजन आहे. 

तिकीट व्हेडिंग मशीन, मिनरल वॉटर मशिन्स, सीसीटीव्ही आहेत. सरकते जिने व लिफ्ट सुविधा असून, अतिरिक्त सरकते जिने, लिफ्ट बसविण्याचे काम सुरू आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZXHCH
Similar Posts
‘गेटवे ऑफ इंडिया’ला ९५ वर्षे पूर्ण मुंबई : भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ला चार डिसेंबर २०१९ रोजी ९५ वर्षे पूर्ण झाली. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या १९११सालच्या ऐतिहासिक भारत भेटीच्या स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले.
‘थॉमस कुक इंडिया’च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी सुबोध भावे पुणे : थॉमस कुक इंडिया या पर्यटन कंपनीने महाराष्ट्रातील सहलींसाठी प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आता ‘थॉमस कुक इंडिया’च्या पर्यटकांना त्यांच्या युरोप सहलीदरम्यान आपल्या या आवडत्या कलाकाराशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
महाबळेश्वर गारठले; वेण्णा तलाव परिसरात धुक्याची चादर महाबळेश्‍वर : गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला आहे. प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर गरम कपडे, शाली, स्वेटर्स, वूलनचे कपडे घालून फिरताना दिसत आहेत.
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language