
मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो. त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटीस’मधून जागृती केली आहे.
मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, मधुमेह कोणाला होऊ शकतो, त्याची लक्षणे दुष्परिणाम, अवयवांना जाणविणारा धोका, मधुमेहातील बेशुद्धावस्था, मधुमेहाचे प्रकार, त्यावरील औषधोपचार, आहार व व्यायामाचे प्रकार, इन्सुलिनचे महत्त्व, तपासणी, पायांची निगा, मधुमेही स्त्री व गर्भधारणा या विषयी शास्त्रीय माहिती लेखकाने दिली आहे.
वेगवेगळ्या आजारात डॉक्टर पोषक आहारपद्धती समजावून सांगतात. केवळ आजार झाला म्हणून नाही, तर निरोगी शरीरासाठी ‘डाएट’ आहार फायदेशीर ठरतो. ‘डाएट फूड’ म्हणजे नेमके आहे तरी काय, त्यातील पोषणमूल्ये अशी सर्व माहिती मालविका करकरे यांनी ‘डाएट मंत्रा’ या आहारविषयक पुस्तकातून दिली आहे. कुपोषण व अतिकुपोषण टाळून ‘फिट’ राहण्यसाठी योग्य व पोषक आहार कसा असावा, जंकफूडचे तोटे, आरोग्यासाठी चौरस आहाराचे महत्त्व सांगून पाककृतीही दिल्या आहेत.
पुस्तक : गुड बाय डायबेटीस + डाएट मंत्रा
लेखक : डॉ. कैलास कमोद, मालविका करकरे
प्रकाशक : वैशाली प्रकाशन
पाने : ४११
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)