Ad will apear here
Next
गुड बाय डायबेटीस + डाएट मंत्रा
मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो. त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटीस’मधून जागृती केली आहे.

मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, मधुमेह कोणाला होऊ शकतो, त्याची लक्षणे दुष्परिणाम, अवयवांना जाणविणारा धोका, मधुमेहातील बेशुद्धावस्था, मधुमेहाचे प्रकार, त्यावरील औषधोपचार, आहार व व्यायामाचे प्रकार, इन्सुलिनचे महत्त्व, तपासणी, पायांची निगा, मधुमेही स्त्री व गर्भधारणा या विषयी शास्त्रीय माहिती लेखकाने दिली आहे.

वेगवेगळ्या आजारात डॉक्टर पोषक आहारपद्धती समजावून सांगतात. केवळ आजार झाला म्हणून नाही, तर निरोगी शरीरासाठी ‘डाएट’ आहार फायदेशीर ठरतो. ‘डाएट फूड’ म्हणजे नेमके आहे तरी काय, त्यातील पोषणमूल्ये अशी सर्व माहिती मालविका करकरे यांनी ‘डाएट मंत्रा’ या आहारविषयक पुस्तकातून दिली आहे. कुपोषण व अतिकुपोषण टाळून ‘फिट’ राहण्यसाठी योग्य व पोषक आहार कसा असावा, जंकफूडचे तोटे, आरोग्यासाठी चौरस आहाराचे महत्त्व सांगून पाककृतीही दिल्या आहेत.

पुस्तक : गुड बाय डायबेटीस + डाएट मंत्रा
लेखक : डॉ. कैलास कमोद, मालविका करकरे
प्रकाशक : वैशाली प्रकाशन
पाने : ४११
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZNFBX
Similar Posts
गुडबाय डायबेटीस मधुमेह म्हणजे डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो, हे आता माहित झाले आहेच म्हणूनच या आजाराची लागण झाली की त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटिस’मधून जागृती केली आहे.
मधुमेह कसा होतो? मधुमेह अर्थात डायबेटीस हे अलीकडे आबालवृद्धांच्या काळजीचे कारण झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मधुमेह झालेले अगदी कमी वयाचे रुग्णही आता सहज आढळू लागले आहेत. डायबेटीस कसा टाळायचा, तो का होतो, तो झाला तर काय करायचे, अशा विविध गोष्टींवर डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुडबाय डायबेटीस’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे
मधुमेह कसा होतो? मधुमेह अर्थात डायबेटीस हे अलीकडे आबालवृद्धांच्या काळजीचे कारण झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मधुमेह झालेले अगदी कमी वयाचे रुग्णही आता सहज आढळू लागले आहेत. डायबेटीस कसा टाळायचा, तो का होतो, तो झाला तर काय करायचे, अशा विविध गोष्टींवर डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुडबाय डायबेटीस’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे
वन मिनिट बायोग्राफी - भाग १ व २ थोरामोठ्यांच्या चरित्रांची आणि आत्मचरित्रांची पुस्तके बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती माहिती क्षणार्धात प्राप्त होऊ शकते; मात्र, त्या माहितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीचा नेमका आणि अचूक संदर्भ प्राप्त व्हावा, या उद्देशाने डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language