
पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे. तोंडवळा, प्रावीण्य व प्रवृत्ती, जन्मखुणा, आवाज अशा गोष्टींनी पुनर्जन्म ओळखता येतो. पुनर्जन्माचा शास्त्रीय पुरावा, आत्मा, मृत्यूची भीती, मृत्यू समीप अनुभव, मोक्ष आदींवरही चर्चा केली आहे.
मानवी जन्ममृत्यूच्या चक्राचे फलित काय आणि हे चक्र केव्हा थांबेल या मुद्द्यावर तात्विक आणि आध्यात्मिक विचार केला आहे. यासह पुनर्जन्म, मृत्यूनंतरचे जीवन या विषयांचा अभ्यास करणारे डॉ. ब्रायन वाईज, डॉ. स्टीव्हन्सन, डॉ. सतवंत पासरिचा यांच्या संशोधनाची माहितीही दिली आहे.
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन
पाने : २५९
किंमत : ३५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)