पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि शासकीय कार्यालयांमध्ये मोठया उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उत्घाटनही थेतले यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उपाध्यक्ष सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, जिल्हा परिषद सदस्य धर्मा गोवारी, विनिता कोरे, सुरेश तरे, अशोक वडे व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.