
शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा मार्ग असल्याचे शिवरायांनी मराठी माणसांना सांगितले, असे लेखक म्हणतात. म्हणूनच ‘स्वराज्य’ म्हणजेच स्वतःचे राज्य, स्वतःचा व्यवसाय करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले.
स्वराज्याची स्थापनेची ध्येयप्राप्ती त्यांनी कशी केली हे यात स्पष्ट केले आहे. स्वराज्य उद्योग म्हणजे काय, स्वराज्य उभारणी, पायाभूत सुविधांची उभारणी, खर्चाशिवाय स्वराज्य विस्तार, ग्राहक म्हणजेच रयतेचे समाधान, औद्योगिक सुरक्षा, कर्मचारी कल्याण योजना, रेन हार्वेस्टिंग, नवीन कल्पनांना ध्यास, नैसर्गिक साधनांचा उपयोग, प्रादेशिक समतोल अशा अनेक संकल्पना शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधणीत प्रत्यक्ष कशा उतरविल्या याचे विवेचन आजच्या उद्योग जगतामधील संकल्पनांचा आधार घेत केले आहे.
प्रकाशन : राजमाता प्रकाशन
पृष्ठे : १९७
मूल्य : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)