
पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा आनंद या वेळी विशेष मुलांना घेता येणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी कळवले आहे.