Ad will apear here
Next
नीलेश राणे एक एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार
रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश नारायणराव राणे हे एक एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, देवगडचे आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या नंतर रत्नागिरीमध्ये स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा होईल.

२३ एप्रिलला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. एक एप्रिलला ते रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बाळा कसालकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता सतीश सावंत, रत्नागिरी जिल्हा प्रवक्ता नित्यानंद दळवी, जिल्हा प्रभारी राजन देसाई, सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, विकास कुडाळकर, भालचंद्र कोळंबकर, एकनाथ नाडकर्णी, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संध्या तेरसे, रत्नागिरीच्या महिला जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, सिंधुदुर्गचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, रत्नागिरीचे युवक जिल्हाध्यक्ष वैभव विरकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अविनाश पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, विकास पाटील, लांजा तालुकाध्यक्ष संजय यादव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष बापू सुर्वे, रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, राजापूरचे तालुकाध्यक्ष हनिफ मुसा काझी, परिमल भोसले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZKRBY
Similar Posts
रत्नागिरीत एक मे रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नवीन व सुरू असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री आणि हवाई परिवहन मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीत एक मे २०१८ रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे
‘तटरक्षक’च्या इमारतीचे राजेंद्र सिंग यांच्या हस्ते अनावरण रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या येथील मुख्य प्रशासकीय इमारतीचे अनावरण तटरक्षक दलाचे प्रमुख महानिदेशक राजेंद्र सिंग यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. या बरोबरच तटरक्षक दलाचे कार्यालय विमानतळ येथून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मिरजोळे ब्लॉक एच-टू या भूखंडावर स्थलांतरित झाले आहे
‘महाराणा प्रतापसिंह कलादालनामुळे वैभववाडीच्या वैभवात भर’ सिंधुदुर्ग : ‘महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राच्या उभारणीमुळे वैभववाडीच्या वैभवात भर पडली आहे,’ असे प्रतिपादन पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन नुकतेच त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वांत मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language