Ad will apear here
Next
कुपोषण निर्मूलनासाठी पदभरती
प्रातिनिधिक फोटोपालघर : कुपोषण निर्मूलनासाठी व बालमृत्यू रोखण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत वैद्यकीय अधिकारी आणि सहायक परिचारिका प्रसाविका (ANM) या पदांसाठी आरोग्य विभागामार्फत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे  यांनी ही माहिती दिली आहे.

जिल्ह्यात पावसाळ्या नंतर येणारे आजारपण आणि त्यानंतर ओढवणारे बालमृत्यू यांवर निर्बंध आणण्यासाठी जिल्हा सेस फंडातून या नियुक्त्या ३१ मार्च २०१८पर्यंत करण्यात येणार आहेत. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात पदे आणि सहायक परिचारिका प्रसाविका (ANM) अशी १५ पदे भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील कुपोषणाचे दुष्टचक्र मोडीत काढून जनसामान्यांना आरोग्याच्या योग्य सोयीसुविधा मिळाव्यात व बालमृत्यूंना आळा घालण्याकरिता पालघर जिल्हा परिषदे मार्फत सर्व आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी केले. पावसाळ्यापूर्वी योग्य उपयोजना करून कुपोषणाची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास यावर मात करणे अवघड जाणार नाही, असे मत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZEUBD
Similar Posts
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली
‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले
‘मुकुल माधव’तर्फे शौचालयांसाठी अर्थसहाय्य पुणे : रानावनात भटकंती... आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ... डोंगराळ भागात राहणारे... मुख्य प्रवाहापासून दूर असणारे... इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवही आता ‘टॉयलेट’मध्ये जाणार आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language