Ad will apear here
Next
पीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू
उंड्री आणि मंचर येथील दालनांचे उद्घाटन
पीएनजी ज्वेलर्सच्या उंड्री येथील दालनाचे उद्घाटन करताना अभिनेत्री रविना टंडन

पुणे : शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे नवीन दालने सुरू केली आहेत. 

उंड्री येथील दालनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले, तर मंचर येथील दालनाचे उद्घाटन अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ व अन्य  मान्यवर उपस्थित होते. या दोन्ही दालनांसह पीएनजी ज्वेलर्सची आता ३७ दालने आहेत.  

पीएनजी ज्वेलर्सच्या मंचर येथील दालनाचे उद्घाटन करताना अभिनेत्री सई ताम्हणकर

या दोन्ही नवीन दालनांच्या प्रारंभाबाबत बोलताना सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘नवीन दालन सुरू करणे आणि नव्या बाजारपेठेत प्रवेश करणे आमच्यासाठी कायमच एक उत्साहपूर्ण घटना असते. पीएनजी कुटुंब विस्तारत असून, आमच्या ग्राहकांना अधिक चांगली आणि जलद सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. दागिन्यांचे व्यापक पर्याय, प्रगत सुविधा आणि अविरत सेवा यांमुळे ग्राहकांना खरेदीचा एक आनंददायी अनुभव मिळेल.’

ते पुढे म्हणाले, ‘पुण्याचा विस्तार चहूबाजूने होत असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांपासून उपनगरांपर्यंतचे अंतर वाढत चालले आहे. त्यामुळेच ग्राहकांनी प्रवास करून मध्यवर्ती ठिकाणी येण्यापेक्षा जिथे ग्राहक आहेत, तिथेच आम्ही पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत विविध उपनगरांमध्ये व पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पीएनजीचा विस्तार होत असून, त्यात आज उंड्री व मंचरचा समावेश होत आहे, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दोन दालनांच्या सादरीकरणामुळे जिल्ह्यातील आमचे स्थान मजबूत होणार आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZSTCF
Similar Posts
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
पीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर पुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले.
पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने एक लाख १९ हजार रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही ऑफर
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language