Ad will apear here
Next
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या
कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
.........
सरकारी सर्वेक्षणानुसार असे आढळून आले आहे, की आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटना (अपेक्षित आणि अनपेक्षित) आणि योजना यांमधील आर्थिक जागरूकता यांच्या बाबतीत बरेच जण कमी पडतात. योजनांविषयीचे ज्ञान आणि घटनांबाबतची जागरूकता यांमध्ये प्रचंड दरी आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक शिस्तबद्ध पद्धतीचा अवलंब करता येतो. आर्थिक नियोजनाच्या प्रमुख पाच पायऱ्या आहेत. त्या अशा -

आपले लक्ष्य ठरवा... (Determine the goal) 
प्रत्येकाने वास्तवदर्शी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, ज्यात घरखरेदी, निवृत्तीनंतर उत्पन्न मिळत राहावे म्हणून गुंतवणूक करणे, व्यवसाय सुरू करणे इत्यादी. हे लक्ष्य गाठण्यासाठी किती पैसा आणि कालावधी लागणार आहे हे ठरवणे. अर्थात परिश्रम केल्याशिवाय कोणतेही लक्ष्य पूर्ण होऊ शकत नाही. आपण जर आपले लक्ष्य पूर्ण केले आणि यशाचे शिखर गाठले, तर निवृत्तीनंतर अशा व्यक्तीला घरात व समाजात खूप मानसन्मान मिळतो. 

आर्थिक नियोजन तयार करा (Make a Financial Planning)
सुरक्षा, परतावा, तरलता व करबचत या चार गोष्टी आर्थिक नियोजन करताना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात; पण उच्च परताव्यासाठी कधी सुरक्षेला कमी महत्त्व द्यावे लागते. सुरक्षाच हवी असेल, तर परतावा कमी मिळतो. वय, आर्थिक गरजा, कुटुंबाचा आकार, इतर कुटुंबीयांच्या इच्छा व उपलब्ध साधने अशा अनेक गोष्टी लक्षात घ्याव्यात. काही गरजा स्पष्ट असतात, तर काहींचा अंदाज करावा लागतो. अडीअडचणींसाठी तरतूद ठेवावी. अग्रक्रम ठरवावा. हे आर्थिक नियोजन स्थिर नसावे. त्याचा आढावा घेत राहावा. कारण कालानुरूप आपल्या इच्छा, गरजा यात बदल होत राहतो. विद्यार्थिदशेत असताना परतावा, सुरक्षा महत्त्वाची ठरते. तरलता व करबचत जबाबदारी नसल्याने कमी महत्त्वाच्या ठरतात. तेच लग्न झाल्यावर तरुणपणी परतावा, करबचत यांकडे लक्ष दिले जाते. तरलताही बघावी लागते. निवृत्तीनंतर सुरक्षा महत्त्वाची वाटते. 

सध्याचे आणि भविष्यकालीन आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी किती रक्कम गरजेची आहे, याची जाणीव ठेवावी लागते. तसेच कालावधी, धोके उद्भवण्याची शक्यता आणि गुंतवणूक पर्याय या घटकांचाही विचार केला जातो. आजारपण, जोडीदाराचे निधन किंवा नोकरी गेल्यास बचत कायम राहावी म्हणून आकस्मितता योजना आखून ठेवणेही गरजेचे असते.

थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, आर्थिक लक्ष्य आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय निवडावा. 
आपली आर्थिक कुवत तपासूनच गुंतवणुकीची उडी मारा, क्षमतेपेक्षा अधिक उडी मारण्याचा प्रयत्न केल्यास अशी गुंतवणूक फसू शकते किंवा लक्ष्यांना धक्का पोहोचू शकतो.

विविध गरजांची पूर्तता करणारी वेगवेगळी गुंतवणूक साधने उपलब्ध आहेत. 
गुंतवणूक/बचत : इक्विटी, एमएफए, युलिप, विमा योजना, निवृत्ती योजना, कर्जविषयक साधने 
आर्थिक सुरक्षा : आयुर्विमा योजना आणि आरोग्य विमा 
करबचत : एनएससी, ईएलएसएस, पीपीएफ इत्यादी 

गुंतवणुकीस सुरुवात करा (Start Investment)
आर्थिक नियोजन यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. आजच्या घडीला बहुतेक गुंतवणूक ऑनलाइन माध्यमांतून करता येते; पण तरीही गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूक साधनांमधील धोके व त्यांचे स्वरूप आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न हे समजून घेणे गरजेचे आहे. 

योजनेचा नियमितपणे आढावा घ्या (Keep a track record of the scheme)
गुंतवणूक सुरू केल्यानंतर तुम्ही स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. वाढलेले उत्पन्न किंवा खर्च, नवीन मालमत्ता खरेदी किंवा बाजारपेठेतील बदलती परिस्थिती यांचा आढावा घेणे महत्त्वाचे असते. विविध गुंतवणुकीची कामगिरी कशा रीतीने चालली आहे याचा आढावा घेतला गेला पाहिजे. 

गुंतवणूक काढून घेणे (Withdrawl of Investment)
तुम्ही ज्यासाठी बचत करीत होतात, तो मापदंड किंवा लक्ष्य पूर्ण झाले, की तुम्हाला गुंतवणूक काढून घ्यायची गरज असते. तुमची गुंतवणूक काढून घेताना करारासंबंधीच्या बाबींविषयी तुमच्या आर्थिक सल्लागारांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. एक लक्षात ठेवा, गरज असेल तरच गुंतवणूक काढून घ्या, अन्यथा नाही. ‘चूका ध्यान गयी जान.’

ऐकावे जनाचे करावे मनाचे (be a leader not follower)
गुंतवणूक करताना सहकारी, नातेवाईक किंवा शेजारी यांचे आंधळेपणे अनुकरण करू नका. त्यांच्या आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत आणि गरजांमध्ये फरक असू शकतो; अवास्तव परतावा, तसेच फसव्या किंवा बेकायदेशीर योजनांपासून चार हात दूर राहा. तज्ज्ञ व माहितगार सल्लागारांचे मार्गदर्शन घेऊनच कृती करा. म्हणजे फसवणुकीची शक्यता टाळता येऊ शकते. 

(‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ हे दिशोत्तमा प्रकाशनाचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVTCI
Similar Posts
गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस लग्नकार्य, मोठी खरेदी अथवा खर्च, यासाठी माणूस मिळकतीमधील थोडे पैसे बाजूला ठेवत असतो. यालाच बचत म्हणतात; पण गुंतवणूक आणि बचत यात फरक आहे. याबाबतच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र’ हे पुस्तक लिहिले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून आर्थिक उद्दिष्ट
‘स्मार्ट’ गुंतवणूक... संपत्तीच्या दीर्घकालीन वृद्धीसाठी : मंदार म्हात्रे (व्हिडिओ) पैशांची बचत, गुंतवणूक याबाबत आपल्याला सल्ले देणारे बरेच जण असतात; पण त्यातून बऱ्याचदा ही गुंतवणूक म्हणजे एक ओझं होऊन बसते. ही गोष्ट लक्षात घेऊन, गुंतवणूक या विषयातील तज्ज्ञ मंदार म्हात्रे यांनी ‘पापा डोन्ट प्रीच’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात
आर्थिक नियोजनात सतत सुधारणा हव्यात.. आर्थिक नियोजन ही अत्यंत महत्त्वाची आणि विचारपूर्वक करण्यासारखी गोष्ट आहे. कमी वयात गुंतवणूक सुरू करणे आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार आपल्या गरजांचा आढावा घेऊन त्यात नियोजनात सतत सुधारणा करत राहणे गरजेचे असते. या आर्थिक नियोजनाची दिशा नेमकी कशी असावी, याबद्दल आज पाहू या ‘समृद्धीची वाट’ या सदरात
‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’ शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे, की जी कधी क्षणात श्रीमंती देते, तर कधी तितक्याच वेगाने देशोधडीलाही लावू शकते. शेअर बाजाराच्या या ‘किमये’बद्दलचे काही गमतीशीर आणि काही धडे देणारे स्वानुभव सांगत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language