Ad will apear here
Next
‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१९मध्ये घोषित होणार्‍या वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार ‘कोसमाप’चे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.

प्रथम श्रेणीच्या सात पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. कादंबरी, कथा, कविता, समिक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांसाठी हे पुरस्कार दिले जातील. यात र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्कारांचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.

विशेष सात पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे असून, यात कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक एकांकिका, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाङ्मय पुरस्कार, वि. कृ. नेरूरकर संकिर्ण वाङ्मय पुरस्कार, अरुण आठल्ये संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकीका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुर्वाता वसई पुरस्कार यांचा समावेश आहे.

पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१९पूर्वी पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांच्याकडे पाठवाव्यात. लेखक, कवी ‘कोमसाप’च्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातील) असावा; तसेच तो ‘कोमसाप’चा आजीव सभासद असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचे ‘कोमसाप’ जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. पुस्तकाचा वाङ्मय प्रकाराचा स्पष्ट उल्लेख (कथा, कादंबरी, कविता, ललित वाड्.मय आदी) लेखकाने पुस्तकांसोबत करायचा आहे. पुस्तके एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या एका वर्षात प्रकाशित झालेली असावीत. एखाद्या लेखकाच्या, कवीच्या एका वाङ्मय प्रकाराच्या पुस्तकाचा पुरस्कारासाठी फक्त दोन वेळाच विचार केला जाईल, अशी माहिती ‘कोमसाप’चे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी दिली. 

पुस्तकाच्या प्रती पाठविण्यासाठी पत्ता : प्रा. अशोक रा. ठाकूर द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, ता. जि. पालघर, ४०१ ४०४ यांच्याकडे पाठवाव्यात. 
ई-मेल : ashokthakur46gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZINCC
Similar Posts
‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना दरवर्षी वाङ्मयीन पुरस्कार दिले जातात. डिसेंबर २०१८मध्ये दिल्या जाणार्‍या वाङ्मयीन पुरस्कारासाठी कोकणातील साहित्यिकांकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार ‘कोमसाप’चे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.
डॉ. अनंत देशमुख यांना ‘कोमसाप’चा ‘कोकण साहित्य भूषण’ पुरस्कार रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) २०१८-१९चे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी जाहीर केले. ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ‘कोकण साहित्य भूषण’ या सन्मानाने गौरविण्यात येणार असून, ‘निद्रानाश’ या नव्या कवितासंग्रहासाठी
‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन मालवण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) मालवण शाखेच्या वतीने संध्या धोंडू मळेकर यांच्या स्मरणार्थ ‘माझा आवडता लेखक-लेखिका’ या विषयावर कोकण प्रभाग खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
संतांनी केलेल्या बंडखोरीकडे आजच्या साहित्यिकांनी पाहावे : डॉ. अरुणा ढेरे रत्नागिरी : ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वांत मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी आणि तीसुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! गीता शूद्रांपर्यंत पोहोचवणं ही बंडखोरीच होती. या संतकालीन बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language