Ad will apear here
Next
लायन्स क्लबतर्फे मोफत मधुमेह तपासणी
पत्रकार परिषदेत माहिती देताना (डावीकडून) सतीश राजहंस, शाम खंडेलवाल, डॉ. चंद्रहास शेट्टी, डॉ. गौरी दामले व दिनकर शिलेदार.

पुणे : ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. १९ नोव्हेंबर) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे’, अशी माहिती लायन्स क्लब्जचे माजी प्रांतपाल लायन चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी लायन श्याम खंडेलवाल, लायन सतीश राजहंस, दिनकर शिलेदार, डॉ. गौरी दामले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लायन चंद्रहास शेट्टी म्हणाले, ‘नागरिकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता रॅलीने होणार असून, सिटीप्राईड थिएटर, कोथरुड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अशी ही रॅली निघणार आहे. त्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीमध्ये विद्यार्थी, खेळाडू, मधुमेह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक आणि लायन्स सदस्य सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी दहा ते साडेबारा या वेळेत मधुमेह व अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. त्यामध्ये इन्शुलिनविषयी समज-गैरसमज, मधुमेहाबाबत घ्यायची काळजी, लहान मुलांमधील मधुमेहाची कारणे व दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदान जागृती व तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी १२ ते तीन या वेळेत याच ठिकाणी मधुमेहासंबंधी तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.’

‘या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शशिकांत सुतार, समाजरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. परवेज ग्रांट व समाज मित्र पुरस्कार प्राप्त डॉ. संजय पठारे, प्रांतपाल रमेश शहा, माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा रसिकलाल धारिवाल, उपप्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे, लायन अभय शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, दिलीप वेडे पाटील, मंजुश्री खर्डेकर, अल्पना वर्पे, पतित पावन संघटनेचे पुण्याचे शहराध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित असणार आहेत’, असेही संयोजकांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZTBBU
Similar Posts
‘व्यायाम व सकस आहाराने मधुमेहावर नियंत्रण शक्य’ पुणे : ‘नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतला, तर मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते; किंबहुना त्याला दूर ठेवता येते. मधुमेहामुळे शरीरारातील प्रत्येक घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाला कशाप्रकारे हाताळावे यासाठी मार्ग व पद्धती शोधायला हव्यात’, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांनी केले
‘लायन्स’तर्फे डॉ. ग्रांट, डॉ. पाठारे यांना पुरस्कार जाहीर पुणे : ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांना समाजरत्न पुरस्कार, तर वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पाठारे यांना समाज मित्र
मधुमेह नियंत्रणासाठी बदला जीवनशैली सध्याच्या काळात मधुमेह होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, तरुण वर्गातही याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. हा जीवनशैलीचा आजार मानला जातो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ठराविक जीवनशैली राखावी लागते. जागतिक मधुमेहदिन १४ नोव्हेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने मधुमेहतज्ज्ञ डॉ. योगेश कदम यांनी लिहिलेला हा मार्गदर्शनपर लेख
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने दगडूशेठ गणपतीजवळ वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून, येथे भाविकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language