
वाडा : भारतीय बौद्ध महासभा, वाडा तालुका यांच्या वतीने रमाईनगर नेहरोली (ता. वाडा, जि. पालघर) येथे सूर्यपुत्र यशवंतराव (भैयासाहेब) आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बौद्धाचार्य, उपासक, उपासिका व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सामूहिक सूत्रपठण आयोजित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी पालघर जिल्हा संस्कार उपाध्यक्ष प्रकाश जाधव, संरक्षण उपाध्यक्ष नारायण जाधव, वाडा तालुका अध्यक्ष सुजय जाधव, कोषाध्यक्ष सुरेश कांबळे, हिशेब तपासनीस खैरकर गुरुजी, उपाध्यक्ष विनोद वाघचौरे, महिला उपाध्यक्ष मंदाताई कांबळे, पर्यटन सचिव ऋतिक थुले, नेहरोली ग्रामशाखेचे अध्यक्ष प्रदीप खैरकर, प्रा. किरण थोरात, भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा मनीषाताई भालेराव, नेहरोली येथील बौद्ध उपासक-उपासिका, तसेच पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.