Ad will apear here
Next
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर


२६ ते २८ मार्च २०२१ या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे संशोधक आणि विज्ञानासारख्या प्रामुख्याने इंग्रजीवरच आधारित असलेल्या क्षेत्रात कार्यरत असूनही शुद्ध आणि साध्या-सोप्या मराठी भाषेत साहित्यनिर्मिती करणारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या रूपाने साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहे. 

१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरमध्ये जन्म झालेले नारळीकर हे भारताचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ. भारत सरकारने त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा उचित गौरव करून त्यांना ‘पद्मविभूषण’ पदवी बहाल केली आहे. २०१० साली महाराष्ट्र सरकारनेही त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.

बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्सी केल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन अत्यंत हुशार गणितज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. तिथे असताना त्यांना १९६२ साली स्मिथ्स पुरस्कार आणि १९६७ साली अॅडम्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. किंग्स कॉलेजचे फेलो म्हणून १९७२पर्यंत तिथल्या विद्यापीठात काम करत असताना त्यांनी आपले गुरू फ्रेड हॉइल यांच्याबरोबर खगोलशास्त्रात संशोधन करून ‘बिग-बँग-थिअरी’पेक्षा वेगळा असा ‘स्टेडी-स्टेट-थिअरी’ सिद्धांत मांडला. तो हॉइल-नारळीकर सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे.

१९७२नंतर भारतात परत येऊन त्यांनी १९८९पर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या ख्यातनाम संस्थेमध्ये अॅस्ट्रोफिजिक्स विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. क्वांटम फिजिक्स, क्वांटम कॉस्मोलॉजी, गुरुत्वाकर्षण या विषयांमध्ये त्यांनी संशोधन केलं आहे. 

१९९९पासून पृथ्वीभोवतालच्या वातावरणात अतिउंचीवर (४१ हजार मीटर्स) ‘सूक्ष्मजीवांचे अस्तित्व’ या विषयावर एका आंतरराष्ट्रीय समूहासह त्यांचं काम सुरू असून, त्यांना त्या उंचीवर काही सूक्ष्म पेशी आणि जीवाणूंचं अस्तित्व असल्याचे  धक्कादायक शोध लागले आहेत. 

जयंत नारळीकर हे अत्यंत वाचकप्रिय विज्ञान लेखक असून, त्यांनी आपल्या साहित्यातून विज्ञान सोपं करून सांगितलं आहे. मातृभाषेतून साहित्यनिर्मिती आणि व्याख्यानं या माध्यमातून त्यांचे मराठीसाठीचे योगदान मोठे आहे. ‘चार नगरातले माझे विश्व’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘खगोलशास्त्राचे विश्व’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘यक्षांची देणगी’, ‘वामन परत न आला’, ‘प्रेषित’ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. ‘चार नगरातले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. ‘यक्षांची देणगी’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे. 

‘विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाने डॉ. विजया वाड यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.

(डॉ. नारळीकर यांचे साहित्य बुकगंगा डॉट कॉमवरून सवलतीत थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IUWTCU
Similar Posts
विश्वगान पसायदान : प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांची मुलाखत (व्हिडिओ) पुण्यातील सूर-सखी मंचातर्फे नुकताच ‘हा होईल दान पसावो... विश्वगान पसायदान...’ या विषयावर कार्यक्रम सादर झाला. या वेळी प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांची मुलाखत घेण्यात आली. प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी हे बहुपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्या संस्कृत विशारद असून, संतवाङ्मयावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्या
‘महाभारत हे केवळ धर्मयुद्ध नव्हते’ : डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांची विशेष मुलाखत आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले पुण्यातील ज्येष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे १९ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. (जन्मतारीख : १४ फेब्रुवारी १९१८) संस्कृत भाषा, ऋग्वेद, महाभारत, निरुक्ता, तसेच पाली, प्राकृत भाषेतील संशोधन आणि अवेस्ता या पारशी ग्रंथाचे संशोधन अशा विविध विषयांत डॉ
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल! पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे
डॉ. अनिल अवचट यांच्या दिलखुलास गप्पागोष्टी (व्हिडिओ) हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेले प्रख्यात साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचा २६ ऑगस्ट हा जन्मदिन. त्या निमित्ताने, डॉ. अनिल अवचटांच्या विविध विषयांवरच्या दिलखुलास गप्पा, तसेच त्यांचे ओरिगामीचे कौशल्य आणि त्यांनी सादर केलेली कविता आदींचा बाइट्स ऑफ इंडियाच्या संग्रहातील व्हिडिओ शेअर करत आहोत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language