Ad will apear here
Next
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार’
लोकसभेच्या सभापती खासदार सुमित्रा महाजन यांच्यासोबत रवींद्र गुर्जर.पुणे : ‘मराठी भाषा ही जगातील १०व्या क्रमांकाची भाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करेन,’ असे आश्वासन लोकसभेच्या सभापती खासदार सुमित्रा महाजन यांनी दिले.

९१ व्या बडोदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र गुर्जर आणि 'साहित्यसेतू'चे प्रा. क्षितीज पाटुकले यांनी ‘मराठी भाषेला त्वरीत अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,’ अशी मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी महाराष्ट्रातील विविध संस्था कार्य करीत आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त करून बृहन्महाराष्ट्र आणि विदेशातील मराठी संस्थांच्या कार्याची दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठीमध्ये नवीन युवा लेखक, अनुवादक तयार व्हावेत, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती युवा पिढीबरोबर जोडली जावी आणि देश-विदेशातील मराठी साहित्य संस्थांमध्ये समन्वय निर्माण व्हावा, म्हणून साहित्य सेतू जे कार्य करीत आहे, याबद्दल महाजन यांनी त्यांचे कौतुक केले.

या वेळी संमेलनच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी गुर्जर यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शैलेंद्र बोरकर, अनिल कुलकर्णी, तुषार पाटील, कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTWBI
Similar Posts
पुणे येथे ब्लॉगलेखन कार्यशाळा पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉगर बना’ ही लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. यात ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉगलेखन कसे करावे, त्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, ब्लॉग निर्मिती प्रक्रिया आणि कमर्शियल ब्लॉगिंग या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.   ब्लॉगलेखन
पुण्यात अनुवाद लेखन कार्यशाळेचे आयोजन पुणे : साहित्य सेतू व महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) यांच्या वतीने ‘अनुवाद कसा करावा?’ ही लेखन कार्यशाळा १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदाशिव पेठेतील एमईएस ऑप्टिमेट्री कॉलेज येथे ही कार्यशाळा होईल.
खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली : ‘खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात संसदीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे’, असा गौरव लेाकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला. येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन झाले
गणेशमूर्तींवरील जीएसटी हटविण्याची मागणी मुंबई : लोकसभेत २८ जुलै रोजी झालेल्या कामकाजात खासदार धनंजय महाडिक यांनी, गणेशमूर्तीवर आकारण्यात आलेल्या ‘जीएसटी’ला जोरदार विरोध दर्शवला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत खासदार महाडिक म्हणाले, ‘कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने होते. तसेच संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language