Ad will apear here
Next
पुण्यात ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’
आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारा विशेष कार्यक्रम
पुणे : जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जीवनशैली, खाद्यसंस्कृती याबद्दल जाणून घ्यायचे आहे, तर मग रविवारी, ३० सप्टेंबर रोजी ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ या अनोख्या कार्यक्रमाला हजेरी लावा. पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यात काम करणाऱ्या ‘वयम्’ चळवळीने पुण्यात आदिवासी नृत्य, संगीत व खाद्यसंस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून, सदाशिव पेठ येथील भावे प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम होणार आहे. 

‘‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ म्हणजे पिढ्यान् पिढ्या निसर्गाच्या निकट सहवासात बहरलेल्या वन संस्कृतीची थेट भेट घडवणारा अनोखा जलसा आहे. यामध्ये आदिम संवेदना जागवणारे तारप्याचे सूर, थिरकत्या नृत्याचा ठेका, रानमातीत वाढलेल्या भाज्यांचा अनवट गंध एकाचवेळी अनुभवता येईल. आदिवासी जीवन पद्धतीची झलक दाखवणारा हा कार्यक्रम असून, यामध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा कार्यक्रम सशुल्क असून, ३०० रुपये प्रति प्रवेशिका शुल्क आकारले जाईल. यामध्ये आदिवासी नृत्य, संगीत यासह रानखाद्याची चवही चाखता येईल’, अशी माहिती ‘वयम्’ चळवळीचे प्रमुख कैलास नरवडे यांनी दिली.  

‘‘वयम्’ जवाहरच्या आदिवासी पाड्यांमध्ये गेली १० वर्ष कार्यरत आहे. आदिवासी समाजाला सक्षम करत स्वतःचे हक्क स्वतः मिळविणेसाठी संघटित आणि सबळ करण्याचे काम ‘वयम्’ चळवळ करते. रोजगार हमी योजना ते पेसा कायदा अशा वेगवेगळ्या कायद्यांचे प्रशिक्षण घेऊन शासन दरबारी आपले म्हणणे पोहोचवण्यासाठी अनेक लोक तयार झाले आहेत. अशाच काही महिला आणि पुरुष यांना एकत्र आणून तिथल्या संस्कृतीच्या श्रीमंतीची पुणेकरांना ओळख व्हावी आणि काही गोष्टींमध्ये हा समाज किती श्रीमंत,पुढारलेला आहे याची ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे’, असे या ‘वयम्’चे सचिव मिलींद थत्ते यांनी सांगितले. 

कार्यक्रमाविषयी 
आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारा कार्यक्रम 
‘वयम्’तर्फे जंगलम् मंगलम् चविष्टम्  
स्थळ : भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे  
वेळ : रविवार, ३० सप्टेंबर.
शुल्क : ३००/- रुपये. 
संपर्क : कैलास नरवडे : ९६०४५ ३३९१९
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZKTBS
Similar Posts
आदिवासी भागात शौचालये व सोलर पंपाची उभारणी पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात १३० शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यातील तिसऱ्या टप्प्यातील वाडा तालुक्यातील बावेघर, हमरापूर व केव गावात ५० शौचालयांचे
आदिवासी गावांत २०७ शौचालयांची उभारणी पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण २०९ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चौथ्या टप्प्यांत वाडा तालुक्यातील केलटान, सापाने व कारळगाव येथे ७७ शौचालयांचे व सोलर पंपाचे उद्घाटन १५ जून २०१९ रोजी झाले
‘मुकुल माधव’तर्फे शौचालयांसाठी अर्थसहाय्य पुणे : रानावनात भटकंती... आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ... डोंगराळ भागात राहणारे... मुख्य प्रवाहापासून दूर असणारे... इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवही आता ‘टॉयलेट’मध्ये जाणार आहेत.
आदिवासींच्या कलेला ‘ट्राइब छत्री’चे कोंदण पुणे : भारतातील आदिवासींच्या ६८० जमातींनी निर्मित केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’ प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मेळघाटचे कोरकू दाम्पत्य बाजीराव कासदेकर, रिमाय बाजीराव कासदेकर आणि पूर्वांचलच्या विद्यार्थिनी मायसिलीन, चिची, मंजू, अफेन, आचीन यांच्या हस्ते करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language