Ad will apear here
Next
स्त्रीसंवेद्य
स्त्रीच्या मनाला विविध कंगोरे असतात. ते जाणून घेते. साहित्याच्या स्त्रीमनाचा शोध डॉ. नीलिमा गुंडी यांनी ‘स्त्रीसंवेद्य’मधून घेतला आहे. याचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाच्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्यापासून केला आहे.

स्त्रीवर लादलेले ‘दुय्यम नागरिकत्त्व’, पोथीपुराणातील स्त्रीधर्माबाबच्या अतिशयोक्त कल्पना, विधवा पुनर्विवाह, स्त्रीची उन्नत्ती व शिक्षण या विषयांवरील ताराबाईंच्या लेखनाचा आढावा यात घेतला आहे. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याशी स्त्रीच्या जगण्याविषयी पत्रातून संवाद साधत लेखिकेने त्यांच्याविषयीचे कुतूहल व्यक्त केले आहे. इंदिराबाई वाडीकर यांची चाकोरी ओलांडण्याची वृत्ती व महिलांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती यातून मिळते.

ज्ञानव्रती दुर्गाबाई भागवत, शकुंतलाबाई व सई परांजपे या मायलेकींचे कर्तृत्व, मराठी स्त्रीसाहित्यविश्वात वैचारिक सकस लेखन करणाऱ्या प्रज्ञावंत लेखिका प्रतिभा रानडे यांची ओळख होते; तसेच पद्मजा फाटक, इंदिरा संत, मलिका अमर शेख, कविता महाजन आदी कवयित्री, लेखिकांचे साहित्य व ‘मिळून साऱ्याजणी’च्या वाटचालीचा मागोवा यात घेतला आहे.

पुस्तक : स्त्रीसंवेद्य : स्त्रीच्या भावविश्वाचा शोध
लेखक : डॉ. नीलिमा गुंडी
प्रकाशक : अभिजित प्रकाशन
पाने : १५२
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZTXBX
Similar Posts
कवितेच्या शोधात कविता करणे हा अनेकांचा छंद असतो. कविता अनेक प्रकारच्या असतात. त्यातून प्रेम, माया, भक्ती, राग-लोभ, चीड, संताप अशा मनातील सर्व भावना व्यक्त होतात. संतांच्या रचना याही कवितेचाच एक भाग असतात. अशा अनेकविध काव्याचे व कवींचे रसग्रहण अरुणा ढेरे यांनी ‘कवितेच्या शोधात’ यातून केले आहे.
उजेड आणि सावल्या ‘ललित स्वरूपाच्या लेखनात वाचकाला आपली हरवलेली, विखुरलेली संवेदनशीलता सापडते,’ असे डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. ते खरेच, करण म्हणूनच वैचारिक साहित्याच्या जमान्यात ललित लेखनाचा वाचक टिकून आहे.
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि
छोट्या छोट्या गोष्टी पुस्तकांच्या नावाप्रमाणे विजय पाडळकर यांनी सांगितलेल्या या छोट्या छोट्या कथा आहेत. कमी शब्दांत खूप काही सांगण्याचे त्यांचे कसब या कथांमधून दिसते. ‘काळजी’ या कथेतला विरोधाभास स्पर्शून जातो. पैसा, मानमरातब पाहून मित्र भारावून गेलेला असतो; मात्र, त्यापाठीमागचे वास्तव त्याला माहित नसते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language