Ad will apear here
Next
रहस्यमय इजिप्तचा शोध
इजिप्त हे प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. नाईल नदी, ग्रेट पिरॅमिड्स व स्फिंक्स ही येथील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. पिरॅमिडबद्दल तर गूढ कुतूहल असते. इजिप्तच्या अशा गूढ चेहऱ्यापर्यंत पोचून त्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न पॉल ब्रन्टन यांनी ‘रहस्यमय इजिप्तचा शोध’मधून केला आहे. तेथील गुढात्मक मंदिरे आणि देवता यांचे आध्यात्मिक महत्त्व यांचा धांडोळा घेताना ग्रेट पिरॅमिडमध्ये एकट्याने घालविलेल्या रात्रीचे वर्णनही केले आहे.

इजिप्तमधील विविध पैलूंची ओळख करून देणे आणि मन-शरीर नात्याच्या भोवती मुख्यत्वे गुंफण करणे हा लेखकाचा हेतू आहे. स्फिंक्सच्या सहवासात रात्र घालविताना त्यांना जो वेगळा अनुभव आला त्यातून स्फिंक्सचे मरुस्थळाचा संरक्षक म्हणून दर्शन घडते. वाळवंटात येणाऱ्या वेगवान वादळामुळे वाळूत अडकलेल्या स्फिंक्सला बाहेर काढण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. इजिप्तमधील दुसरे नवल म्हणजे पिरॅमिड्स. त्यातही लेखकाने भटकंती केली व त्याचा पूर्ण वेगळा अनुभवही यात कथन केला आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. सुरुची पांडे यांनी केला आहे.      

पुस्तक : रहस्यमय इजिप्तचा शोध
लेखक : पॉल ब्रन्टन
अनुवादक : डॉ. सुरुची पांडे
प्रकाशक : वॉव पब्लिशिंग्ज् प्रा. लि.
पाने : ३६८
किंमत : ३७५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZOXBV
Similar Posts
... अशा लागतात सवयी! आपण जे करतो, त्याचे सवयीत रूपांतर कसे होते, सवयीत चांगले बदल कसे घडवून आणायचे, यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी कशा उपयुक्त ठरतात, आदींबद्दलचे मार्गदर्शन चार्ल्स डुहीग यांनी ‘द पॉवर ऑफ हॅबिट’ या पुस्तकातून केले आहे. मोहन गोखले यांनी त्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे. सवयी कशा लागतात आणि त्यांचे कार्य
वाचता वाचताच ‘सँडविच’च्या मोहात पाडणारं पुस्तक! मराठी माणसाच्या स्वयंपाकघरात भारतातल्या इतर अनेक राज्यांतल्या पदार्थांनी शिरकाव केला असला, तरी ज्या ब्रिटिश पदार्थाने हक्काचं स्थान पटकावलंय तो पदार्थ म्हणजे ‘सँडविच’! पुण्याचे शेफ विराज आठवले यांनी त्यांच्या दीर्घ अनुभवातून ९८ ब्रुशेटा आणि १६३ प्रकारच्या सँडविचेसच्या पाककृतींचं ‘शेफ स्पेशल सँडविचेस’ हे देखणं पुस्तक सँडविच-प्रेमींसाठी आणलं आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही
आरोग्य तुमच्या हातात - अर्थात रोगानुसार योगा आपल्या सर्वांकडे एक गोष्ट समान असते ती म्हणजे शरीर. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्त्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष वेधत प्रा. दिनेश भालके यांनी ‘आरोग्य तुमच्या हातात अर्थात रोगानुसार योगा’मधून योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language