
नंदुरबार : येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर उपस्थित होते. आपल्या भाषणातून त्यांनी वेगवेगळ्या अंमली पदार्थाच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांची गंभीरता लक्षात आणून दिली. त्यामुळे सामाजिक संस्था, कुटुंबसंस्था कशी उद्ध्वस्त होते याची उदाहरणे दिली.
या वेळी उपनगर पोलीस स्टेशनचे श्री. पंडित, शाळेच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक डॉ. एम. एम. हिवाळे, पर्यवेक्षक व्ही. आर. पवार, वंदना जाबिलसा, मीनल वळवी, प्रसाद दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
