Ad will apear here
Next
पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांसाठी ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना
पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करताना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर ,सुबोध भावे, उपायुक्त नीलिमा धायगुडे व अन्य कर्मचारी

पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पूराचे पाणी ओसरत आहे. पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत, वस्तू व सेवा-सुविधा गतीने पोहोचविणे आवश्यक आहे. यापुढे मदत पोहोचविण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरविणे, तसेच साफ-सफाईवर भर देणे गरजेचे आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने या भागातील कचरा हटवून निर्जंतुकींकरणाची कामे गतीने करावीत. पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती व अन्य कार्यवाही करावी. वीज पुरवठा खंडित असणाऱ्या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा. पुराचे पाणी ओसरलेल्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू कराव्यात.’

उपायुक्त निलिमा धायगुडे यांच्या देखरेखीखाली मदत केंद्राचे कामकाज सुरू असून, विविध संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. दरम्यान, अभिनेते सुबोध भावे यांनी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली; तसेच सध्या पूरग्रस्तांना कोणत्या वस्तू व साहित्याची आवश्यकता आहे, याची माहिती जाणून घेतली. या वेळी अभिनेते विनोद खेडेकर, अश्विनी तेरणीकर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVLCD
Similar Posts
पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन पुणे : ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा येथे करावी,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले.
कॅटलिस्ट फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत पुणे : ‘पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कॅटलिस्ट फाउंडेशन वस्तू रुपात मदत गोळा करून देणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे
‘पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील’ सांगली : ‘सैन्याला केवळ विजयच ठाऊक असतो. पुरात अडकलेल्या प्रत्येक माणसाला बाहेर काढेपर्यंत बचाव कार्य सुरूच राहील. शुक्रवारी दिवसभरात पाच हजार लोकांना अवघड ठिकाणांहून बाहेर काढण्यात आले आहे,’ अशी माहिती जनरल ऑफिसर कमांडिंग नवनीत कुमार यांनी दिली.
‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला पुणे : पुराच्या तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील गावांमध्ये अनेक ठिकाणांहून मदत पोहोचत आहे; पण आभाळच कोसळल्यावर ठिगळ तरी कुठे, कुठे लावणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे या मदतीच्या हातांमध्ये आपलाही एक हात असावा या उद्देशाने आर्यन्स वर्ल्ड स्कूल संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language