Ad will apear here
Next
केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान
डॉ. विनायक सोलापूरकरपुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेमध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांचे ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचे हे ३५ वे पुष्प आहे. शुक्रवारी, दि.२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे हे व्याख्यान होणार आहे.

‘चौदाव्या शतकात केरळमध्ये माधवा नामक गणिततज्ज्ञ  होऊन गेले. त्यांनी आणि त्यांच्या परंपरेतील शिष्यांनी निर्माण केलेली संशोधन संपदा थक्क करणारी आहे. भारतात विकसित झालेल्या गणिताच्या इतिहासातील केरळीय गणित एक महत्वाचा; पण उपेक्षित असा अध्याय आहे. त्याचा उलगडा सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. विनायक सोलापूरकर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, सर्वानी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा’, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विनय र. र. यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPKBU
 In which language and script were his writings done ? Do they exist .?
In which library are they storied ? Have they been deciphered ? Are
there people who can read the the originals ?
Similar Posts
‘केरळीय गणितामध्ये माधवांचे बहुमोल योगदान’ पुणे : ‘भारतीय गणित शास्त्राला एक प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. चौदाव्या शतकामध्ये केरळमध्ये माधवा हे महान गणिततज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे व संबंधित पुराव्यांमुळे आज आपल्याला गणितासारखा किचकट विषय सोप्या पद्धतीने समजू लागला आहे. गणित विषयामध्ये माधवांचे योगदान बहुमोल
‘पूर परिस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत’ पुणे : ‘धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरणे बांधायला विरोध करतात; परंतु धरणेच बांधली गेली नाहीत, तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार? त्यामुळे
‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे ‘मौखिक कर्करोग’ या विषयावर डॉ. अंकित शहा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. दिनांक : १९ मे २०१७ वेळ : सायंकाळी सहा वाजता स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन, सेमिनार हॉल, नवी पेठ,
ऐका वैज्ञानिक गप्पा पुणे : मराठी विज्ञान परिषद आणि आयसर, पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात डॉ. नीरजा देशपुत्रे यांचे ‘केमिस्ट्री ऑफ कार्बोहायड्रेट्स’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उद्या, १२ मे रोजी सायंकाळी हे व्याख्यान विज्ञानप्रेमींना ऐकता येईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language