Ad will apear here
Next
गडचिरोली ते गुगल... स्वप्नीलची भरारी
गुगल-युडॅसिटी शिष्यवृत्तीसाठी निवड
स्वप्नील बांगरे
मुंबई : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील स्वप्नील बांगरे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, गुगल-युडॅसिटी शिष्यवृत्ती मिळवली आहे. युडॅसिटी नॅनोडिग्रीचा विद्यार्थी असलेल्या स्वप्नीलने आपले स्वप्न खरे करून दाखवले आहे. स्वप्नीलची युडॅसिटीमध्ये निःशुल्क अँड्रॉइड बेसिक्स अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, तो अँग्युलर जेएस अॅप्लिकेशनवर काम करत आहे. भारतात अँड्रॉइड डेव्हलपर्ससाठी असलेल्या गुगल-युडॅसिटी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात त्याची निवड झाली. 

याबाबत स्वप्नीलने सांगितले, ‘ही शिष्यवृत्ती मिळणे हे उडण्यासाठी पंख मिळाल्यासारखे होते. ही अद्भुत संधी प्राप्त झाल्यामुळे मला एक चांगला लीडर आणि अँड्रॉइड डेव्हलपर बनण्यास मदत झाली. मी तरुणांना असे आग्रहाने सांगू इच्छितो, की तुम्हाला काही शिकायचे असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मला दिलेल्या असाधारण सहकार्याबद्दल मी युडॅसिटीचे, माझे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला माझे डेव्हलपरचे कौशल्य वाढविण्यास आणि त्यात नैपुण्य प्राप्त करण्यास खूप मदत केली.’

आपला नॅनोडिग्रीचा अभ्यासक्रम विकसित करण्याबरोबरच नॅनोडिग्री पूर्ण झाल्यावर आपल्या पदवीधरांना सर्वोत्तम संभाव्य रोजगार संधी उपलबद्ध करून देण्यासाठी युडॅसिटीने गुगल आणि जगातील कित्येक अन्य आघाडीच्या औद्योगिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. यामध्ये बर्टेल्समान, लिफ्ट आणि एटी अँड टी आदी कंपन्यांचाही समावेश आहे. जगभरात एक लाख ८० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केली आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSABS
Similar Posts
पुण्यातील क्रिकेटचे संग्रहालय गुगलच्या व्यासपीठावर; घरबसल्या पाहता येणार सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये भारताचे क्रिकेटपटू कशी चमक दाखवणार आणि प्रतिस्पर्ध्यांना नमवून चषक आपल्याकडे खेचून आणणार का, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच क्रिकेटवेड्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट घडली आहे. जगभरातील क्रिकेटचा समृद्ध वारसा जतन करणाऱ्या ‘ब्लेड्स ऑफ
माडिया भाषेतील पहिल्या पुस्तकाची निर्मिती पुणे : महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तर भागातील आदिवासींच्या ‘माडिया’ भाषेतील लिखित स्वरूपातील पहिले पुस्तक पुणे विद्यापीठातील जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे.
चौथी, पाचवी नव्हे; भाषा एकच...पैशाची! गुगल असिस्टंट आता हिंदी व मराठीसह आठ भाषांमध्ये वापरता येणार असल्याचे गुगलने नुकतेच जाहीर केले. अॅलेक्सा हे आपले उपकरण हिंदी व हिंग्लिशमध्ये संभाषण करू शकेल, असे अॅमेझॉनने जाहीर केले. भारताची बाजारपेठ काबीज करायची असेल, तर बाजारपेठेची भाषा बोलायला पाहिजे, हे इंगित या कंपन्यांना पुरते कळून चुकले आहे.
नवे सिद्धार्थ ‘निर्माण’ होताना... अस्वस्थ तरुणांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधण्यासाठी, ‘मी’, ‘माझे’ व ‘माझ्यासाठी’ याच्या संकुचित सीमा ओलांडून, त्या पलीकडच्या वास्तवाला भिडण्यासाठी व तरुणांना त्यांच्या आयुष्याचं मिशन ठरवण्यासाठी मदत करण्याकरिता डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी ‘निर्माण’ची निर्मिती केली. गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांवर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language