Ad will apear here
Next
कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन
कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते.कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज आणि ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, ‘बी. व्होक. अँड कम्युनिटी कॉलेज’चे समन्वयक सतीश गायकवाड, प्रमुख पाहुण्या अक्षया बोरकर, अॅडव्होकेट गौरी भावे, राहुल इंगवले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या वेळी प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी महाविद्यालयासंदर्भात आणि बी. व्होक. ग्राफिक्स डिझाइन या संदर्भात माहिती दिली.
या कॉन्फरन्समध्ये अॅडव्होकेट गौरी भावे यांनी कापीराइट अॅक्टसंबंधी मार्गदर्शन केले. यामध्ये कलाकारांनी केलेली पेंटिंग्ज, क्राफ्ट, डिझाइन्स, लोगो, सिम्बॉल, कन्सेप्ट्स यांचे कॉपीराइट्स या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच ‘आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’च्या संस्थापिका अक्षया बोरकर यांनी ऑनलाइन मार्केटिंगबद्दल सविस्तर माहिती देऊन, यासाठी असणाऱ्या विविध वेबसाइट्सबद्दल मार्गदर्शन केले. त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी, फायदे-तोटे यांवर सविस्तर चर्चा केली. या कॉन्फरन्समध्ये कलाकारांच्या प्रश्नांनाही अशी उत्तरे देण्यात आली.

या वेळी ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर, कराड येथील चित्रकार दादासाहेब सुतार, प्राचार्य सुरेश पोतदार, सातारा येथील प्राचार्य विजय धुमाळ, इस्लामपूर येथील प्राचार्य प्रदीप पाटील, विनय देशपांडे, दयानंद माळी, चित्रकार कुलदीप पोतदार, तसेच विविध कला महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी, कलारसिक उपस्थित होते.

स्नेहल पोतदार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. राहुल इंगवले यांनी आभार मानले. माधुरी पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZHEBE
Similar Posts
‘विवेकानंद’मध्ये कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’ कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये ‘बी. व्होक., ग्राफिक्स डिझाइन विभाग’ आणि पुणे येथील ‘आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी’च्या वतीने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’ या विषयावर शनिवारी, १५ जुलै रोजी सशुल्क एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत ही कार्यशाळा होईल
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले
वीर सेवा दलातर्फे पशुसंवर्धन आयुक्तांची भेट कोल्हापूर : येथील वीर सेवा दल जिल्हा व तालुका समितीतर्फे पशु संवर्धनाच्या विविध समस्यांसंदर्भात पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांची भेट घेऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली. गीर गोवंशाच्या ‘सिमेन’चा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने या भेटीत ती मागणी प्रामुख्याने करण्यात आली. पशू आहार,
विवेकानंद कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे अनावरण कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राजकीय व्यवस्था व विचार’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language