कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज आणि ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, ‘बी. व्होक. अँड कम्युनिटी कॉलेज’चे समन्वयक सतीश गायकवाड, प्रमुख पाहुण्या अक्षया बोरकर, अॅडव्होकेट गौरी भावे, राहुल इंगवले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी महाविद्यालयासंदर्भात आणि बी. व्होक. ग्राफिक्स डिझाइन या संदर्भात माहिती दिली.
या कॉन्फरन्समध्ये अॅडव्होकेट गौरी भावे यांनी कापीराइट अॅक्टसंबंधी मार्गदर्शन केले. यामध्ये कलाकारांनी केलेली पेंटिंग्ज, क्राफ्ट, डिझाइन्स, लोगो, सिम्बॉल, कन्सेप्ट्स यांचे कॉपीराइट्स या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच ‘आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’च्या संस्थापिका अक्षया बोरकर यांनी ऑनलाइन मार्केटिंगबद्दल सविस्तर माहिती देऊन, यासाठी असणाऱ्या विविध वेबसाइट्सबद्दल मार्गदर्शन केले. त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी, फायदे-तोटे यांवर सविस्तर चर्चा केली. या कॉन्फरन्समध्ये कलाकारांच्या प्रश्नांनाही अशी उत्तरे देण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर, कराड येथील चित्रकार दादासाहेब सुतार, प्राचार्य सुरेश पोतदार, सातारा येथील प्राचार्य विजय धुमाळ, इस्लामपूर येथील प्राचार्य प्रदीप पाटील, विनय देशपांडे, दयानंद माळी, चित्रकार कुलदीप पोतदार, तसेच विविध कला महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी, कलारसिक उपस्थित होते.
स्नेहल पोतदार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. राहुल इंगवले यांनी आभार मानले. माधुरी पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.