Ad will apear here
Next
ग्रामीण रुग्णालयातील ‘त्या’ डॉक्टरकडून दिवसभरात ४८३ जणांवर उपचार


नंदुरबार :
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या अतिदुर्गम, आदिवासी भागातील सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात एक विक्रम झाला. डॉ. संतोष परमार या वैद्यकीय अधिकाऱ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४८३ रुग्णांवर एका दिवसात उपचार केले. या रुग्णालयातील अन्य सात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने गेले काही दिवस ते एकटेच नर्सच्या साह्याने या रुग्णालयाचा पसारा सांभाळत आहेत. 

सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांची जनतेच्या मनातील प्रतिमा फारशी चांगली नसते; मात्र त्याला अपवाद असलेलेही काही जण असतात. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. संतोष परमार. नंदुरबार जिल्हा दुर्गम म्हणून ओळखला जातो. त्यातही धडगाव तालुका म्हणजे अतिदुर्गम. तिथे आजही रस्ते, वीज, पाणी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांची वानवा आहे. 

आदिवासी बहुसंख्याक असलेल्या धडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ डॉक्टर असणे अपेक्षित आहे. त्यापैकी काही जागा रिक्तच आहेत आणि त्यात काही डॉक्टर्सनी काही कालावधीपूर्वी राजीनामे दिले. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञ असलेले डॉ. संतोष परमार हे एकमेव डॉक्टर सध्या तेथे आठवड्याचे सातही दिवस २४ तास सेवा देत आहेत. त्यांच्या जोडीला फक्त नर्स आहेत. गेल्या आठवड्यात एका दिवशी त्यांनी ४८३ रुग्णांवर उपचार केले. त्यात साप चावलेल्या, तसेच अपस्माराच्या रुग्णांचाही समावेश होता. त्या दिवशी दोन पोस्टमॉर्टेमदेखील त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्याच दिवशी पाच गरोदर मातांची प्रसूतीही त्याच रुग्णालयात यशस्वीरीत्या झाली. धडगावच्या डोंगराळ भागात असलेल्या या सरकारी रुग्णालयात आजूबाजूच्या परिसरातल्या जवळपास १५० गावांतील लोक उपचारांसाठी येतात. दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या ४५० ते ५०० एवढी असते. खासगी डॉक्टर कदाचित एका दिवसात इतके पेशंट तपासत असतीलही; पण सरकारी डॉक्टर्सची अनास्था अनेक ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांत दिसते. या पार्श्वभूमीवर, एकट्याने दिवसभर सर्व रुग्णांवर उपचार करणे, ही दखलपात्र गोष्ट आहे.

आपण केवळ कर्तव्य केले, अशी डॉ. संतोष परमार यांची भावना आहे; मात्र अशी उदाहरणे दुर्मीळ झालेली असल्यामुळे रुग्णांनी आणि ग्रामस्थांनी डॉ. परमार यांचे विशेष आभार मानले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZWNCE
 हॅट्स ऑफ डॉक्टर,
 डाँक्टरांना व त्यांना assist करणाऱ्या नर्स ताईंना प्रणाम 🙏🙏🕉🕉🚩🚩1
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
दुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न नंदुरबार : दुष्काळावर मात करण्यासाठी विविध स्तरांवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु त्या १०० टक्के यशस्वी होतातच असे नाही. परंतु गावपातळीवर एखादी व्यक्ती वा समूह स्वयंप्रेरणेने काम करून पाणी नियोजन करतात, त्या वेळी त्यांनी केलेले काम अनेकांना प्रेरणादायी ठरते. त्यापैकीच एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील
सातपुड्याच्या जंगलात आढळले दुर्मीळ पांढरे मोर नंदुरबार : धडगाव तालुक्यातील (जि. नंदुरबार) डोंगर परिसरात दीड हजारांहून अधिक मोर असून, त्यामध्ये शंभरहून अधिक पांढरे मोर असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक आदिवासींकडून सुरू असलेल्या वनसंवर्धनामुळे मोरांची संख्या वाढली आहे. हा भाग सातपुड्यातील पाचव्या व सहाव्या पुड्याच्या आसपास आहे.
आदिवासी भागातील कबड्डीपटू चुनीलालची गरुडभरारी नंदुरबार : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या चुनीलाल पावराने कबड्डीतील प्रावीण्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरील प्रो कबड्डी लीगमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या रूपाने देशाला एक प्रतिभावान राष्ट्रीय कबड्डीपटू मिळाला आहे. दुर्गम आदिवासी भागात राहून,अत्यंत प्रतिकूल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language