Ad will apear here
Next
जगविख्यात मायकल एंजेलोला अनोखे अभिवादन
शंभर चित्रकार एकाचवेळी करणार व्यक्तिचित्रण.....
मायकल एंजेलोपुणे : जगप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार मायकल एंजेलोच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी, नऊ मार्च २०१९ रोजी तब्बल शंभर चित्रकार, शिल्पकार एकत्र येऊन व्यक्तिचित्रण करणार आहेत. पोट्रेट आर्टीस्ट्स ग्रुप व भांडारकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रातिनिधिक फोटो
शनिवारी, नऊ तारखेला हा कार्यक्रम सकाळी नऊ ते पाच या वेळेत लॉ कॉलेज रोडवरील भांडारकर संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातून शंभर चित्रकार, शिल्पकार भाग घेणार आहेत.याच दिवशी हा कार्यक्रम मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व वाराणसी येथेही होणार आहे .  

सकाळी नऊ ते बारा या वेळेत चित्रकार आपले व्यक्तिचित्रणाचे काम करतील. त्यानंतर साडे दहा ते दुपारी दोन या वेळेत रसिकांना ही चित्रे पाहता येतील. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप संध्याकाळी चार ते पाच या वेळेत  संस्थेतील टाटा सभागृहात होणार आहे. या वेळी भांडारकर संस्थेचे रजिस्टार क्युरेटर श्रीनंद बापट हे संस्थेच्या कार्याविषयी, तर डॉ. माधवी मेहेंदळे मायकेल एंजलोवर भाष्य करणार आहेत.

अंतिम प्रत्यक्ष पोट्रेट स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना चित्रकार वासुदेव कामत पोट्रेट आर्टीस्ट्स ग्रुप ग्रँड ट्रॉफी आणि रोख ७५ हजार रुपये, सर्वोत्कृष्ट पोट्रेटसाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमाकांच्या विजेत्याला २५ हजार रुपये तर उत्तेजनार्थ नऊ स्पर्धकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 

जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून चित्रकार, शिल्पकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

कार्यक्रमाविषयी :
व्यक्तिचित्रण उपक्रम 
स्थळ : भांडारकर संशोधन संस्था, लॉं कॉलेज रोड,
दिवस व वेळ : शनिवार, नऊ मार्च, सकाळी १०.३० ते ५.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVNBY
Similar Posts
फिनिक्स भरारीसाठी हवीय साथ... कोरेगाव भीमा इथं एक जानेवारीला झालेल्या हिंसाचारात राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिल्पकार एल्डिन फर्नांडिस यांचा स्टुडिओ बेचिराख झाला. त्यांच्या कलाकृतींचं झालेलं नुकसान भरून येणं शक्यच नाही; पण या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन पुन्हा उभं राहण्याची जिद्द त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. भूषण
सॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य पुणे : विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावायची हा जागतिक पातळीवरील गहन प्रश्न बनला असल्याने त्याबद्दल जगभर संशोधन सुरू आहे. याबाबत नुकत्याच इटलीत झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पुण्यातील दोन मुलींच्या संशोधनाची दखल घेण्यात आली. सायली पोंक्षे
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद पुणे : इटलीतील सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महोत्सवात पुण्याच्या अभिषेक देशपांडेने सात गुणांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत ‘ब’ गटात खेळताना अभिषेक देशपांडेने नऊ डावांत सात गुण मिळवले. गुणांची बरोबरी झाल्याने अभिषेकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत अभिषेकने अग्रमानांकित
पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून १०० घरे उभारण्याचा ‘बालोद्यान’चा संकल्प पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language