Ad will apear here
Next
दाजीकाका गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर
‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली, त्याबद्दल माहिती देताना, स्वप्नील कोरे,  अजय नाईक, सौरभ गाडगीळ, प्रशांत दामले व पराग गाडगीळपुणे : ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ११ ते २१ सप्टेंबरदरम्यान विविध शहरांत होणार असून, अंतिम फेरी २५, २६ सप्टेंबरला पुण्यात होणार आहे. पुण्यात तीन ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

दाजीकाका गाडगीळ यांनी नेहमीच कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे ही स्पर्धा त्यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. ही राज्यस्तरीय स्पर्धा असून, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील स्पर्धक यामध्ये भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या प्रवेशिका ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद आणि गोवा येथील सर्व दालनांमध्ये पाच ऑगस्टपासून उपलब्ध असतील.

दाजीकाका गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धा पीएनजी ज्वेलर्स, पायनापल एक्स्प्रेशन्स स्टुडिओ आणि मैत्री प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने होणार असून, संकल्पना चित्रपट निर्माते अजय नाईक यांची आहे. रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक असतील. विविध विषय सादर करून कलाकारातील कल्पकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही स्पर्धा लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांना चित्रपट, नाटक व टेलिव्हिजन या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेशासाठीचे व्यासपीठ ठरणार आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी ११ ते २१ सप्टेंबरदरम्यान पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि गोवा या ठिकाणी होणार आहे. अंतिम फेरी पुण्यात २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. या शहरांतील सर्वोत्कृष्ट संघ परीक्षकांद्वारे निवडले जातील. परीक्षकांमध्ये एक लेखक, एक दिग्दर्शक, एक महिला व एक पुरुष कलाकार, एक निर्माता, एक कलादिग्दर्शक व एक प्रकाश संयोजक यांचा समावेश असेल. प्रत्येक श्रेणीत तीन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ७५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५१ हजार रुपये, तसेच दोन उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अंतिम विजेत्याला दाजीकाका गाडगीळ करंडक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

या वेळी बोलताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या दाजीकाका गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मागील वर्षी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून, आम्ही या स्पर्धेची परंपरा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. या स्पर्धेमागील मुख्य उद्देश राज्यातील वेगवेगळ्या प्रतिभांना प्रोत्साहन देणे हा आहे. केवळ रसिकांचा प्रतिसादच हे यशस्वी करू शकतो आणि आम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकतो.’
 
या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रशांत दामले म्हणाले, ‘एकांकिका ही अभिनयाची पहिली पायरी असते. यामुळे कलाकाराचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीमध्ये फरक फक्त विषयाचा असतो. या स्पर्धेतील स्पर्धकांना त्यांच्यात काय नाही व काय आहे व पुढे कशी सुधारणा करावी, हे मी सांगणार आहे. मार्गदर्शकाची भूमिका ही माझ्यासाठी नक्कीच आव्हान असणार आहे.’

चित्रपट निर्माते अजय नाईक म्हणाले, ‘गेल्या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यावर या वर्षी स्थानिक तरुण कलाकारांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आम्ही हिंदी व इंग्रजी एकांकिकादेखील समाविष्ट करणार आहोत. प्राथमिक फेऱ्यांमध्ये प्रदीप वैद्य परीक्षक म्हणून काम पाहतील. हे स्पर्धक अनेक वैविध्यपूर्ण विषय घेऊन येतात. या स्पर्धेद्वारे प्रायोगिक ते व्यावसायिक नाटकापर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्या कलावंतांची आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच, या वर्षी बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची राहण्याची सोय आयोजकांमार्फत करण्यात येणार आहे.’

(या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZWYBF
Similar Posts
पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने एक लाख १९ हजार रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही ऑफर
दाजीकाका गाडगीळ करंडकाची चौथी आवृत्ती जाहीर पुणे : पीएनजी ज्वेलर्सतर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेची चौथी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. हा करंडक दर वर्षी स्वर्गीय दाजीकाका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येतो. दाजीकाका गाडगीळ यांनी नेहमीच कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे. ही मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील राज्यस्तरीय
पीएनजी ज्वेलर्सचे हिंजवडी येथे नवीन दालन पुणे : ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पुण्यातील आपले सहावे दालन हिंजवडी येथे सुरू केले असून या दालनाचे उदघाटन प्रसिध्द अभिनेत्री व माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन यांच्या हस्ते झाले. या वेळी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ,कार्यकारी संचालक पराग गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पीएनजी ज्वेलर्सचे पिंपळे सौदागरमध्ये दुसरे फ्रँचायझी स्टोअर पुणे : औंधमधील पहिल्या फ्रँचायजी स्टोअरच्या यशानंतर अवघ्या १५ दिवसातच ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पिंपळे सौदागर येथे दुसरे फ्रँचायझी स्टोअर सुरू केले आहे. या स्टोअरचे उद्घाटन अभिनेत्री करिष्मा कपूर ह्यांच्या हस्ते झाले. या फ्रँचायझी स्टोअरमध्ये आजच्या काळातील महिलांसाठी क्लासिक, तसेच समकालीन डिझाईनचे दागिने उपलब्ध आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language