Ad will apear here
Next
जीवन समजून घेताना
आपले वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान या जीवनाच्या चार महत्त्वाच्या भागांमध्ये समतोल साधता आल पाहिजे, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे. यानुसार ‘जीवन समजून घेताना...’ मधून मन:शांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य त्यांनी उघड केले आहे. 

‘संवेदनशीलता’ हादेखील या चारही चाकांमध्ये समतोल साधण्यासाठीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. असेच वेगवेगळे, अनेकदा आपल्याकडून जाणूनबुजून किंवा अनवधानाने दुर्लक्षित होणारे महत्त्वाचे मुद्दे लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत. हॅरी आणि ललिता अय्यर या प्रमुख पात्रांच्या माध्यमातून मांडलेली ही गोष्ट आहे. समस्या, स्पर्धा, स्व-शोध, सेवा-भाव यातून जीवनाच्या गाडीचा चार चाकांचा तोल कसा पेलला जातो हे त्यांनी सहज पटेल अशा पद्धतीने सांगितले आहे. 

समतोलाचे तत्त्व स्पष्ट करताना दास यांनी वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंग मोकळेपणाने, खुलेपणाने वाचकांसमोर मांडले आहेत. प्रवासाचा-नात्यांमधील परस्पर सामंजस्याचा पाया ‘अध्यात्म’ असल्याचे सांगत यावरही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

पुस्तक : जीवन समजून घेताना
लेखक : गौर गोपाल दास
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाउस
पाने : २०३
किंमत : २२५ रुपये 

(या पुस्तकाचे प्रकाशन २६ मे २०१९ रोजी होत आहे. त्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


(गौर गोपाल दास यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZPBCA
Similar Posts
गौर गोपाल दास यांच्या ‘जीवन समजून घेताना’ पुस्तकाचे २६ मे रोजी प्रकाशन पुणे : आध्यात्मिक गुरू आणि प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी लिहिलेले ‘जीवन समजून घेताना’ हे पुस्तक मंजुल पब्लिशिंग हाउसतर्फे प्रकाशित होत असून, राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे. रविवारी (२६ मे २०१९) सायंकाळी सहा वाजता पुण्यातील कँपमधील
टेस्टी हेल्दी रेसिपीज ‘टेस्टी हेल्दी रेसिपीज’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
पाहावे आपणासी आपण ‘पाहावे आपणासी आपण’ या पुस्तकाचा अल्प परिचय
मिस्टर अँड मिसेस जिना मोहंमद आली जिना हे अत्यंत यशस्वी बॅरिस्टर आणि राष्ट्रीय चळवळीतील उगवता देदीप्यमान तारा होते. रुबाबदार जिना यांचे अनेकांना आकर्षण होते. पण कोणालाही फारसे जवळ करीत; मात्र अत्यंत सुंदर व हुशार रट्टी पेटीट हिला पाहिल्यानंतर मात्र त्यांना तिची ओढ लागली. तीही त्यांच्या प्रेमात पडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language