Ad will apear here
Next
ऐतिहासिक सिमला परिषदेचे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात
दुर्मीळ ठेवा सुपुर्द

पुणे : देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील अनमोल खजिन्यात दुर्मीळ ठेव्याची भर पडली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सिमला परिषदेचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज या चित्रफितीत पाहायला मिळणार आहेत.

प्रकाश मगदूम
याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘रॉयल इंडियन नेव्हीचे तत्कालीन अधिकारी विल्यम टेलर यांनी आठ एमएम प्रकारात बारा मिनिटांची ही ध्वनिचित्रफीत चित्रित केली होती. युनायटेड किंग्डम येथे स्थायिक असलेल्या विल्यम टेलर यांच्या कन्या मार्गारेट साउथ यांनी हे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी पाठवले आहे. विल्यम टेलर यांनी केलेल्या चित्रीकरणात महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी, बॅरिस्टर महंमद अली जिना, डॉ. राजेंद्र प्रसाद, भुलाभाई देसाई, मास्टर तारा सिंह, जी. बी. पंत असे अनेक दिग्गज पाहायला मिळतात. लॉर्ड वॉव्हेल आणि महात्मा गांधी परिषदेआधी भेटून परिषदेच्या ठिकाणी चालत जाताना या चित्रीकरणात दिसतात. पंचवीस जून ते चौदा जुलै १९४५ या दरम्यान पार पडलेल्या सिमला परिषदेतील हा अमूल्य ठेवा आहे.’


 हे चित्रीकरण करणारे विल्यम टेलर यांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यांच्या कन्या मार्गारेट साउथ यांनी हे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिले आहे. यासोबत दिलेल्या  पत्रात त्या म्हणतात, ‘सिमला हे माझ्या वडिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते. वयाच्या सतराव्या वर्षी ते ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेटर कंपनीत रुजू झाले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते रॉय इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले. तेथे लेफ्टनंट या हुद्दय़ावर ते कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त होऊन मायदेशी परतण्याआधी ते सिमला येथे सुट्टीसाठी गेल्याची नोंद आहे. कॅमेरा ही त्यांची विशेष आवड होती. त्या काळात त्यांनी सिमला परिषदेचे केलेले चित्रीकरण महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती यांचे दर्शन घडवते. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZUHCD
Similar Posts
महात्मा गांधींचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी पुणे : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधी यांचे दुर्मीळ चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.
‘एनएफएआय’कडे महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थि विसर्जनासाठी घेऊन जाणाऱ्या मद्रास ते रामेश्वरम रेल्वेगाडीच्या प्रवासाचे चित्रीकरण, गांधीजींचा दक्षिण भारत दौरा, हरिजन यात्रा अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे चित्रीकरण असलेल्या चित्रफितींचा दुर्मीळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) मिळाला आहे. महात्मा
‘एनएफएआय’मध्ये चित्रपट जतनासाठी नव्या सुविधा लवकरच पुणे : ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह (एनएफएआय) अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील दुर्मीळ चित्रपटांच्या रिळांचे जतन करण्यासाठी ‘एनएफएआय’च्या कोथरूड येथील तीन एकर जागेत व्हॉल्ट बांधण्यात येतील. यासंबंधीचा प्रकल्प आराखडा तयार झाला आहे,’ अशी माहिती केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली
फ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी पुणे : पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह’ या लघुपट महोत्सवात पुणेकर चित्रपट रसिकांना समीक्षकांनी गौरविलेले फ्रान्स व जर्मनी या देशांमधील लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा कर्टन रेझर अर्थात पूर्वपीठिका म्हणून या महोत्सवाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language