Ad will apear here
Next
‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन पिंपळे सौदागरमध्ये
रांका ज्वेलर्सच्या पिंपळे सौदागरच्या सुवर्ण दालनाच्या घोषणेप्रसंगी (डावीकडून) डॉ. रमेश रांका, ओमप्रकाश रांका, फत्तेचंद रांका, शैलेश रांका, अनिल रांका, (मागे) वास्तुपाल रांका, श्रेयस रांका, तेजपाल रांका, मानव रांका, श्लोक रांका.

पुणे : गेल्या १४० वर्षाची परंपरा असलेल्या ‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन आता पिंपळे सौदागर येथे सुरू होत आहे. कोकणे चौक येथील ‘भूमी अलीयम’ या इमारतीत असलेल्या या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी, ३१ मार्च २०१९ रोजी होणार आहे.  

‘मार्च महिना हा स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी सुपरिचीत आहे. याचेच औचित्य साधून या ११ व्या सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून नातीपर्यंत अशा सर्व नवदुर्गांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे,’ अशी माहिती फत्तेचंद रांका यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी रांका परिवारातील सदस्य ओमप्रकाश, डॉ. रमेश, अनिल, तेजपाल, वस्तुपाल, शैलेश, श्रेयस, मानव आणि श्लोक रांका उपस्थित होते.

‘आयटी क्षेत्रामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त पिंपळे सौदागर, रहाटणी या भागात वास्तव्याला असलेल्या तरुणपिढीची संख्या मोठी आहे. त्यांच्या आणि स्थानिक रहिवाशांच्या आग्रहावरून या परिसरामध्ये हे सुवर्ण दालन सुरू केले आहे. ग्राहकांना मॉलचा अनुभव देणाऱ्या तब्बल साडे आठ हजार चौरस फुटाच्या या प्रशस्त दालनात सोने, चांदी, हिरे, मोती, गिफ्ट आर्टिकल्स व एक ग्रॅम सोन्याच्या दागिनेही उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड, मावळ, खेड तसेच हवेली तालुक्यातील जनतेला आता दागिने खरेदीसाठी पुणे शहरात येण्याची गरज पडणार नाही,’ असेही रांका यांनी नमूद केले. 

रांका ज्वेलर्सच्या पिंपळे सौदागरच्या सुवर्ण दालनाच्या घोषणेप्रसंगी (डावीकडून) डॉ. रमेश रांका, ओमप्रकाश रांका, फत्तेचंद रांका, शैलेश रांका,

‘पारंपारिक दागिन्यांव्यतिरिक्त आधुनिक युगातील युवक युवतींच्या पसंतीचे कमी वजनाचे, योग्य किंमतीचे सोने, चांदी व हिर्यां्चे दागिने येथे मोठया प्रमाणात पहावयास मिळणार आहेत. या व्यतिरिक्त इटालियन ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, जडाऊ, पोलकी, कट डायमंडचे दागिने, तसेच पूजेचे सामान, देवी देवतांच्या मूर्ती व असंख्य गिफ्ट आर्टिकल्स, चांदीचे झोपाळे, चांदीचे फर्निचर, चांदीचे देवघरसुद्धा येथे उपलब्ध असणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

ग्राहकांसाठी खास सवलत योजना 
या नवीन दालनाच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी खास सवलत योजनाही सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३१ मार्च ते ७ मे २०१९ पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवरील मजुरीत भरघोस सवलत देण्यात येणार आहे, तसेच हिऱ्याच्या दागिन्यांच्या किंमतीतही घसघशीत सवलत देण्यात येणार आहे. या योजने व्यतिरिक्त ज्या ग्राहकांना सोने किंवा दागदागिने खरेदी करावयाचे असतील त्यांना सुलभ हप्त्यामध्ये अॅॅडव्हान्स रक्कम देऊन दागिने खरेदी करण्याची सोय करण्यात आली आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZJWBY
Similar Posts
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा
रांका ज्वेलर्सचे ११ वे दालन पिंपळे सौदागर येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या रांका ज्वेलर्स परिवाराच्या पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक येथे असलेल्या ११ व्या सुवर्ण दालनाचे नुकतेच शानदार उद्घाटन झाले. मार्च महिना हा स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी सुपरिचीत आहे. याचेच औचित्य साधून या सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजी पासून नातीपर्यंतच्या
पीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर पुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले.
‘‘लायन्स क्लब’मुळे पोलिसांना घरच्या जेवणाचा आस्वाद’ पुणे : ‘गणेश विसर्जन काळात अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लायन्स क्लबतर्फे उभारलेल्या या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्यासारखे ताजे आणि पौष्टिक जेवण मिळाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language