Ad will apear here
Next
आदिवासी भागातील कबड्डीपटू चुनीलालची गरुडभरारी
प्रो कबड्डी लीगमध्ये निवड
चुनीलाल पावरानंदुरबार : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या चुनीलाल पावराने कबड्डीतील प्रावीण्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरील प्रो कबड्डी लीगमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या रूपाने देशाला एक प्रतिभावान राष्ट्रीय कबड्डीपटू मिळाला आहे. दुर्गम आदिवासी भागात राहून,अत्यंत  प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत त्याने घेतलेली ही गरुडझेप अचंबित करणारी आहे. 

नंदुरबारच्या शिरपूर तालुक्यातील कनगई या दुर्गम आदिवासी गावात शिवलाल व गारीबाई या शेतमजूर दाम्पत्याच्या पोटी एक जुलै १९९७रोजी चुनीलालचा जन्म झाला. दोन भाऊ, दोन बहिणी यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वाघाडी येथील आश्रमशाळेत झाले.

गरिबीशी दोन हात करत शालेय शिक्षण सुरू असतानाच त्याला कबड्डीचे वेड लागले. त्याच्या आई-वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले. परिस्थितीमुळे हताश न होता, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने कबड्डीतील बारकावे समजून घेतले. आपला खेळ प्रभावी, अचूक करण्याकडे लक्ष दिले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध मानाच्या कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

हे करताना शिक्षणही सुरू होते. आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजमधून त्याने डी. फार्म. पूर्ण केले. आपल्या उत्तम खेळाच्या जोरावर त्याने स्वतःचेच नव्हे, तर आई-वडील, समाज आणि शिरपूर तालुक्याचे नावही राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. 

२०१७मध्ये ‘जस्ट कबड्डी सीझन-४’मध्ये त्याने गुजरात वॉरियर्स संघाकडून खेळताना दमदार खेळ करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. यामुळे देशातील नामवंत प्रशिक्षकांचेही त्याच्याकडे लक्ष गेले. २०१८मध्ये ‘जस्ट कबड्डी सीझन-५’मध्ये तो ‘दिल्ली दमदार’ संघाकडून खेळला आणि त्याने संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याची प्रो कबड्डी लीगमध्ये निवड झाली आहे.   

या युवा, प्रतिभावान, मेहनती आदिवासी कबड्डीपटूला साहित्य अथवा इतर खर्चाची जुळवाजुळव करताना अनंत अडचणी येतात. तसेच त्याचा अंगभूत खेळ आणखी खुलण्यासाठी त्याला उत्तम राष्ट्रीय प्रशिक्षकाचीही नितांत आवश्यकता आहे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले, तर येत्या काळात ऑलिंम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेतही चुनीलाल देशाचे नाव नक्कीच झळकवेल यात शंका नाही. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWUBW
 Thanks bhai aage badte jav ham or mere dost tumare sath he....2
 Congratulation Chunilala Bhau
Mala abhiman ahe Tuja tu nakkicha ajun pude javo ani aaplya Samjach V pude jaun Deshacha Pratinidhitav krav. Best Of Luck👍4
 और आगे भिडू एक कदम और.congratulation proud of you.3
 congratulations Chunilal. it's a great apporchunity. keep it up.5
 Good performance
Best of luck your future3
 Good best of luck my friend2
 लय भारी भाया2
 97671586452
 Good performance
Pudchya chance sathi
Best of louck2
 Good luck3
 अभिनंदन3
 Congratulations2
 Congratulations2
 पुढील स्पर्धेसाठी व उर्वरित आयुष्यासाठी लाख-लाख शुभेच्छा ..2
 94216189163
 Congrats3
 Cangratulation2
 Congratulations friend..3
 अभिनंदन3
 आदिवासी समाजाचे नाव रोशन कर1
 Congratulation
 स्वतः च्या मेहनतीने व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आदिवासी समाजाचे व आई - वडिलांचे नाव मोठे केले
माझ्या कडून तुला पुढील स्पर्धा व आयुष्य चांगले जावो अशी शुभेच्छा देतो
 अभिनंदन भाऊ
 Congratulations 💐💐💐💐
 अति उत्कृष्ट कामगिरी घे अजून उँच भरारी💐💐
 Aanand aahe tu pawara asalyacha aani kabaddit nivad zalyacha
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
ग्रामीण रुग्णालयातील ‘त्या’ डॉक्टरकडून दिवसभरात ४८३ जणांवर उपचार नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या अतिदुर्गम, आदिवासी भागातील सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात एक विक्रम झाला. डॉ. संतोष परमार या वैद्यकीय अधिकाऱ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४८३ रुग्णांवर एका दिवसात उपचार केले. या रुग्णालयातील अन्य सात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने
सातपुड्याच्या जंगलात आढळले दुर्मीळ पांढरे मोर नंदुरबार : धडगाव तालुक्यातील (जि. नंदुरबार) डोंगर परिसरात दीड हजारांहून अधिक मोर असून, त्यामध्ये शंभरहून अधिक पांढरे मोर असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक आदिवासींकडून सुरू असलेल्या वनसंवर्धनामुळे मोरांची संख्या वाढली आहे. हा भाग सातपुड्यातील पाचव्या व सहाव्या पुड्याच्या आसपास आहे.
आवारी गुरुजी : जन्मजात संशोधक, बहुपैलू व्यक्तिमत्त्व नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे गंगाराम जानू आवारी गुरुजी. ते केवळ शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर त्यांच्यात एक संशोधक, सूक्ष्म निरीक्षक, अभ्यासक व साहित्यिकदेखील दडलेला होता. अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आवारी गुरुजींच्या जन्मशताब्दीची सांगता पाच जुलै २०१९ रोजी झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language