Ad will apear here
Next
सॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य
पुण्यातील मुलींच्या संशोधनाची इटलीत दखल
इटलीतील रोम येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’मध्ये   शोधनिबंध सादर करताना सायली पोंक्षे आणि गौतमी भोर.
पुणे : विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावायची हा जागतिक पातळीवरील गहन प्रश्न बनला असल्याने त्याबद्दल जगभर संशोधन सुरू आहे. याबाबत नुकत्याच इटलीत झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पुण्यातील दोन मुलींच्या संशोधनाची दखल घेण्यात आली. सायली पोंक्षे आणि गौतमी भोर या दोघींनी सॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट लावणारे छोटे यंत्र विकसित केले आहे.

शहरात निर्माण होणारे या कचऱ्याचे प्रमाण, त्याची लावली जाणारी विल्हेवाट, त्यातून होणारे नदी, मातीचे प्रदूषण, सध्या वापरण्यात येणाऱ्या विघटन प्रक्रियेचा खर्च अशा विविध मुद्द्यांवर या दोघींनी सर्वेक्षण केले. अभ्यास केला आणि घरगुती पातळीवरच या सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने या संकल्पनेवर संशोधन केले. त्यातून त्यांनी विकसित केले ‘दाहिनी’ हे छोटेसे यंत्र. प्रत्येक घरात किंवा सोसायटीतील प्रत्येक मजल्यावर हे यंत्र बसवून या कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल आणि तीही पर्यावरणाला हानी न पोहोचवता. 

त्यांचा हा अभ्यास प्रबंध सादर करण्याकरिता त्यांना नुकत्याच इटलीतील रोम येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’मध्ये बोलावण्यात आले होते. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाची उपस्थितांनी प्रशंसा केली. त्यांच्या उपकरणाचे कौतुक झाले. जगभरातील या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या संकल्पना, अभ्यास जाणून घेण्याची संधी सायली आणि गौतमी यांना मिळाली. 

‘दाहिनी’ हे अगदी आटोपशीर यंत्र असून, प्रत्येक घरात ते बसवणे शक्य आहे. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स जाळले जातात; मात्र त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत वापरली गेली असल्याने त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडसारख्या वायूंचे प्रमाण अगदीच अत्यल्प असते. तसेच त्यातील घटक जळल्यानंतर निर्माण होणारी राखही अगदी अत्यल्प असते. ती झाडांना खत म्हणून वापरता येते. याची किंमतही माफक आहे. यासाठी आर्थिक साह्य मिळाल्यास ती आणखी कमी करणे शक्य होईल. 

आपल्या देशात दर वर्षी सुमारे नऊ हजार टन इतका प्रचंड कचरा हा सॅनिटरी नॅपकिन्सचा असतो. एक सॅनिटरी नॅपकिन संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. यात वापरण्यात आलेले प्लास्टिक, रासायनिक घटक यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. हा कचरा मातीत किंवा पाण्यात टाकला जातो. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होतेच; पण सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होतो. स्त्रियांच्या आरोग्याच्यादृष्टीने चांगला आणि वापरातील सहजता तसेच सहज उपलब्धता यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर वाढला आहे. अलीकडे किफायतशीर किंमतीत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करण्यात येत असून, त्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र याबरोबरच त्याच्या विल्हेवाटीची शास्त्रीय आणि पुरेशी यंत्रणा उभारणेही आवश्यक आहे. त्यासाठी अशी छोटी यंत्रे उत्तम उपाय ठरू शकतील. मोठ्या शहरांमध्ये या कचऱ्याचे विघटन करणारी मोठी संयंत्रे बसवण्यात आली आहेत; मात्र प्रचंड लोकसंख्या, कचऱ्याचे प्रचंड प्रमाण आणि तो उचलण्याची, त्याचे वर्गीकरण करून ती योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपलब्ध यंत्रणेपर्यंत पोहोचवणे ही सगळी व्यवस्था अपुरी आहे. ज्याप्रमाणे ओला कचरा घरच्या घरी विघटन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच प्रोत्साहन हा सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा घरच्या घरी विघटन करण्यासाठी देणे आवश्यक आहे. 

सायली आणि गौतमीच्या या संशोधनाने जागतिक पातळीवरील या समस्येवरील संशोधनात भारताचे आणि पुण्याचे नाव झळकले आहे. सायली आणि गौतमी या दोघीही आयटी इंजिनीअर असून, सायलीने एक वर्ष नामांकित आयटी कंपनीत काम केल्यानंतर नोकरी सोडून उद्योजक रवींद्र गद्रे यांच्यासमवेत पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘ग्रीन अर्थ इक्विपमेंट’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपकरणे तयार करते. पर्यावरणरक्षण हा आवडीचा विषय असल्याने गौतमी सायलीसोबत काम करत आहे. सायली आणि तिची मित्रमंडळी सामाजिक कार्यातही सक्रिय असून, ‘दी एक्स्टसी क्लब’ या त्यांच्या संस्थेतर्फे त्यांनी अंगणवाड्यांचा कायापालट करण्याची मोहीमही हाती घेतली आहे. (अंगणवाड्यांच्या या मोहिमेबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अधिक माहितीसाठी संपर्क : सायली पोंक्षे -   ८९९९८ ४५१३३ , रवींद्र गद्रे :  ९२२५६ १२९५६
इमेल : greenearthequip@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZOIBS
 please send the catalog and price
 Gautami, sayali.. Tumche khoop khoop abhinandan. Great work by both of you. All the best, God bless you.3
 Great job.... Congratulations...This kind of invention is the need of an hour....I would like to have the demo of it. I stay in Mumbai. How can we make it?
 Congratulation
Sagle & Gautami
 Well done, Gautami and Sayali, your invention is the need of the society, congratulations once again
 Social invention, Social Entrepreneur..
Wlhere can we get demo of this unit..2
 I am a proud father.. All the very best to Sayli and gautam...Our support always there..1
 Very good,useful
 Really appreciate ur hard work. It's really good that we make move for protecting our environment. Thanks.
How can I get one unit for my apartment.1
 Very proud of u Saili n Gautami. Congratulations n All d best
 Sayli-Gautami khup khup abhinandan tumchya yasavi prayogabaddal.1
 It's very good quality
 Congratulations both of you...... I really appreciate ur work... I m from mumbai, want to see demo Nd if possible price details also..... I m interested as business point of u.... Waiting for ur reply... Best wishes for your future....
 Good work appreciate
 Congrats both of u. Doing a great job. I would like to see demo..
 अतिशय स्तुत्य उपक्रम. हार्दिक अभिनंदन. वसुधा1
 Very useful, wish you produce this on larger scale
 खूपच उपयुक्तयंत्र आहे प्रत्यक्ष भेटायला आवडेल . अभिनंदन
 We are proud of you sayli and Gautami keep it up this type of motion is highly recommended and required for whole India good luck to you god bless you
 Great job. Keep up the good work. Best wishes for future endeavours Sayali and Gautami.
 Very good.pl tell the price of the machine
 very great job....good going...proud of u Sayali n Gautami. ..congratulations to both of you. ...do tell the price of machine and...if possible demo...heartiest congratulations once again..1
 Excellent & healthy.
 On behalf of all the women in India and world across I am very happy and thankful to you both Sayali and Gautami for doing this great job.
 Information is good for housing society. At present there is no arrangement to pick up sanitary napkins in society. They go with dry garbage to Pune corporation. Is there any arrangement in Pune , Kothrud where we can deliver napkins with periodic intervals at least 3 times a week
What is cost of Dahini if society were to purchase. Do you have any tie up with PMC.
THANKS
S A GURJAR
SECRETARY
BALWANTPURAM SHEFALIKA HEIGHTS S G R SANSTHA1
 Well done girls. It is the most requires equipment for ladies in our country.. govt should provide these machines at all the common places like bus stand .. railway station .. market ..malla ..other offices.schools.
 Great,congratulations1
 Very good invention for health & social useful product.please tell the machine cost .1
 Congratulations girls for great research paper !! We are proud of you. Keep up the good work !!
 Well done, prize please
 Great
We are proud of you
We will be happy to see and use it
 Congratulations to both of u...Can I hv more details regarding the machine, say for eg..Its price, where can we get it, it's demo etc...Pls share1
 Great innovation. We would like to use this at society level. Would like to see the demo soon...
 याची पूर्ण माहिती मला देणे शक्य आहे किंवा हे खरोखर उत्तम आहे .
Similar Posts
आणि अंगणवाड्या खुलल्या... पुणे : अंगणवाडीत पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर त्या दिवशी आश्चर्याचे भाव आणि हसू फुलले होते. का माहितीय? कारण त्यांच्या अंगणवाडीच्या वर्गात जादूच झाली होती. त्यांच्या वर्गाच्या भिंतीवर रंगीत फुले फुलली होती, त्यांचे आवडते प्राणी, पक्षी त्यांच्या भेटीला आले होते. त्यांचा वर्ग एकदम सुंदरच होऊन गेला होता
वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘टाकाऊतून टिकाऊ’ हा विचार केवळ लिहिण्यापुरता मर्यादित न ठेवता तो तंतोतंत अंमलात आणण्यासाठी धडपडणारी पुण्यातली संस्था म्हणजे पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन. प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आदींचा योग्य आणि अभ्यासपूर्ण पुनर्वापर, जनसामान्यांमध्ये जागृती, सॅनिटरी नॅपकिन्सची शास्त्रीय विल्हेवाट असे पर्यावरणविषयक अनेकविध उपक्रम ही संस्था राबवते आहे
रोमचा अग्निप्रलय इसवी सनाच्या पहिल्या शतकात, १९ जुलै ६४ रोजी अज्ञात कारणामुळे इटलीतील रोममध्ये आग भडकते. संपूर्ण शहर बेचिराख करूनच ती शांत होते. एकीकडे राजधानी जळत आहे आणि त्या देशाचा सम्राट नीरो मजेत फिडल वाजवत बसला आहे, ही कथा आपण ऐकून आहोत; पण प्रत्यक्षात तिथं नेमकं काय घडलं होतं?... जाणून घेऊ या ज्येष्ठ लेखक रवींद्र
‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ आरत्यांमध्ये हमखास चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या शब्दांवर कोटी करणारे संदेश हल्ली सोशल मीडियावर फिरत असलेले दिसतात. अशाच काही संदेशांवरूनच पुण्यातील सायली दामले यांना एक भन्नाट कल्पना सुचली. प्रबोधनाचा उद्देश ठेवून त्यांनी या चुकीच्या शब्दांना गंमतशीर चित्रांमध्ये उतरवलं. ‘उच्चारण’ या नावाने सुरू केलेली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language