Ad will apear here
Next
डहाणू येथील विद्यार्थ्यांची सायन्स एक्स्प्रेसला भेट
डहाणू येथील विद्यार्थ्यांची सायन्स एक्स्प्रेसला भेटडहाणू (पालघर) : डहाणू येथील बाहारे आणि जामशेत, सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे १९ जुलै रोजी ‘विज्ञान एक्सप्रेस’ला भेट दिली.

पालघर जिल्हा परिषद आणि रोशनी फाउंडेशन यांनी ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती. ही विज्ञान विशेष गाडी भारतभर भ्रमण करत असून, विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. ५० विद्यार्थी व पाच शिक्षक यांनी हा अनुभव घेतला.

या वेळी विद्यार्थ्यांना गेट ऑफ इंडिया, मंत्रालय, मत्स्यालय, वरळी सी लिंक आदी ठिकाणेदेखील दाखविण्यात आली. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

रोशनी फाउंडेशनच्या गीताबेन मुछाला, संजीव मुछाला यांनी पुढाकार घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZFVBE
Similar Posts
ग्रामीण भागातील चिमुकल्यांनी लुटला पणत्या रंगवण्याचा आनंद डहाणू : ग्रामीण भागातील मुलांमध्ये सुप्त कलागुण असतात; मात्र ते प्रकट व्हायला माध्यम व योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. हेच लक्षात घेऊन पेन सहयोग फाउंडेशनने पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील दाभोण पिलाणपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. पणत्या कशा रंगवाव्यात आणि कशा सजवाव्यात,
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल, डहाणू तालुक्यातील नरपड गावचे देवेंद्र राऊत व वडदे गावचे बाळकृष्ण पऱ्हाड या दोन शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील ‘वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली
डहाणू येथील विद्यार्थ्यांसाठी ‘सायन्स एक्सप्रेस’ भेटीचे आयोजन डहाणू (पालघर) : पालघर जिल्हा परिषद आणि मुंबईतील रोशनी फाउंडेशन यांच्या वतीने डहाणू येथील बाहारे आणि जामशेत सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे १९ जुलै रोजी येणाऱ्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पन्नास

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language