Ad will apear here
Next
संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत दिन कार्यक्रमात अस्मिता फाटक यांचे प्रतिपादन


रत्नागिरी :
‘संस्कृतमध्ये सर्व शास्त्रांवर ग्रंथ आहेत. संस्कृतमधील तत्त्वज्ञान आणि विचार उदार आणि विश्वबंधुत्वाचे आहेत. भारताचा तिरंगा ध्वज भारतीयांना एकत्र आणतो, त्याप्रमाणे संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संस्कृत शिकले पाहिजे,’ असे प्रतिपादन गोदूताई जांभेकर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका अस्मिता फाटक यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागातर्फे २४ ऑगस्ट रोजी संस्कृत दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ‘गीर्वाणकौमुदी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले. संस्कृत विभागप्रमुख तथा कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी संस्कृत विभागाच्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला.

प्राचार्य डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘महाविद्यालयात संस्कृत, उर्दू व गणित या विषयांकरिता विशेष उपक्रम राबवले जातात. गेल्या पाच वर्षांत संस्कृतचे तीन विद्यार्थी मुंबई विद्यापीठात गुणवत्ताधारक ठरले. नाट्य, गीत, नृत्य या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास होत आहे. संस्कृत विभाग सक्षमपणे समाजासाठीही काम करत आहे.’

संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमधून सादर झाला. विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील नाटिका, नांदी, नृत्य आदींचे सादरीकरण केले. या सर्व कार्यक्रमांबद्दल अस्मिता फाटक यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. संस्कृत दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीतगायन केले. या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांच्यासमवेत उपस्थित होते. संस्कृत शिक्षिका स्नेहा शिवलकर यांनी प्रास्ताविक केले. सिमंतिनी जोशी हिने सूत्रसंचालन केले.

(हेही जरूर वाचा : जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZRACD
 Nice work
 Nice
 सुंदर उपक्रम.
पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
 छान झाला कार्यक्रम
 It would help if grammer is used like a dictionary , used for reference

only . Not a subject to be studied . It would also help if it is simplified .
Similar Posts
राष्ट्रीय संस्कृत संस्थानतर्फे नऊ ऑगस्टला रत्नागिरीत शिक्षण केंद्राचे उद्घाटन रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गेली चार वर्षे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू आहे. यंदाच्या वर्गाचे उद्घाटन नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेचे
संस्कृत शिक्षणाची चळवळ मोठी व्हायला हवी रत्नागिरी : ‘संस्कृत शिक्षणाची चळवळ आणखी कशी मोठी होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. ही चळवळ माध्यमिक शाळांपर्यंत पोहोचवण्याकरिता मी नक्कीच मदत करीन. परंतु लहान मुलांना जास्तीत जास्त सहभागी करून घेतले पाहिजे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी केले
विविध कार्यक्रमांनी रंगले संस्कृत स्नेहसंमेलन रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रातर्फे रविवारी (१७ फेब्रुवारी) संस्कृत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या या संमेलनात गीत, नृत्य, समूहगायन, कथाकथन,
इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय रत्नागिरी : ‘संस्कृत ही पुरातन भाषा सध्या लोकव्यवहारातून मागे पडली असली, तरी इंटरनेटमुळे संस्कृतचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागतो आहे. ऑनलाइन पोर्टल्स, वेबसाइट, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाइन रेडिओ अशा विविध माध्यमांतून संस्कृत पत्रकारिता बहरू लागली आहे. सध्या देशभरात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language