
कृष्ण हे नाव समोर आले की, त्याची विविध रूपे आठवतात. बाळकृष्ण, कान्हा, मुरलीधर, वासुदेव, योगेश्वर अशा अनेक नावांमधील त्याचे रूपही वेगळे असते. काही कथांमधून श्रीकृष्णाचे जे रूप रंगविले आहे, त्यापेक्षा तो वेगळा कसा आहे, याचा अभ्यास बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केला. कथांमधील कृष्ण त्यांनी ‘श्रीकृष्ण चरित्र’ वाचकांसमोर सादर केला आहे.
कृष्णाच्या वंशावळीबद्दल हरिवंश, विष्णूपर्व, ऋग्वेदातील उल्लेख देत यदुवंशाचा विस्तार, कृष्णजन्म, कृष्णाचे बालपण व बालपणीच्या दैवी लीलांच्या कथेचा अर्थ उलगडून दाखविला आहे. वृंदावनवासी किशोरवयीन कृष्णाशी निगडीत पराक्रमाच्या गोष्टींबद्दल विचार व्यक्त केले आहेत. कृष्ण म्हटले की गोपिका, राधा यांचे नाव त्याला जोडूनच येते. याबाबतची सत्यता यात पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. कंस वधातून दिसलेल्या कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाची बाजू, त्याचे अध्ययन, द्वारकेतील वास्तव्य, कृष्णाच्या भार्या, द्रौपदी स्वयंवर, सुभद्राहरण, महाभारतातील उद्योगपर्व, युद्धातील प्रसंग, यादव कुलाचा सर्वनाश यातून श्रीकृष्णाच्या मानव चरित्राची मीमांसा केली आहे. याचा मराठीत संक्षिप्त स्वैर अनुवाद चारुशीला धर यांनी केला आहे.
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन
पाने : १२६
किंमत : १७५ रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)