पंढरपूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, १४ मे रोजी रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीउत्सवात गट-तटाचे राजकारण व जाती-पातीच्या सीमा पार करून सर्व नागरिक एकत्र आले होते. रोपळे गावात पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या महापुरुषांची जयंती साजरी झाल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
रोपळे गावात यंदा प्रथमच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. न्यू गोल्डन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या अनोख्या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संभाजी महारांजी जयंती राजकारणविरहित साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी या उत्सवात गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व औद्योगिक क्षेत्रातील मंडळींना सहभागी करून घेतले. छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन निवृत्त कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजळ्याचे पूजन पुणे येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक शिवाजी भोसले यांच्या हस्ते, तर भगव्या झेंड्याचे पूजन सरपंच दिनकर कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
न्यू गोल्डन तरुण मंडळाला दहा झाडांची रोपे व दहा ट्री गार्ड देण्याची घोषणा या वेळी रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले यांनी केली. गाव कामगार तलाठीपदी निवड झालेले दादा पाटोळे यांचा सत्कार विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपसरपंच गणेश भोसले, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक मोहन काळे, हर्षवर्धन शहा, विलास भोसले, जनसेवा संघटनेचे अशोक पाटोळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनाजी खरे, श्री दत्त इरिगेशन सिस्टीम संस्थेचे संचालक दत्तात्रय भोसले, डॉ. हनुमंत खपाले, प्रवीण करपे, विजय करपे, हेमंत यादव, साधू माने, अशोक पाटील, बाळासाहेब भोसले, सतीश भोसले, दादा पाटोळे, प्रदीप भोसले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रदीप भोसले यांच्या उन्हाळी वर्गामध्येही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.