Ad will apear here
Next
सफर... रत्नागिरीत येण्याची...


रत्नागिरी म्हणजे रत्नांची नगरी. अनेक नररत्ने या भूमीने देशाला दिली. या भूमीला इतिहासाचा वारसा आहे आणि इथला भूगोल मन रिझवणारा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा शुभ्र, रूपेरी वाळूचा, फेसाळणाऱ्या लाटा अंगावर घेणारा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. हिरवाईत सामावलेला निसर्ग, लाल मातीतील शिवारे, किल्ले, सागरकिनारे, धबधबे यांसह विविध देवतांची पुरातन मंदिरे, देवस्थाने, स्कूबा डायव्हिंग अशा विविधांगी पर्यटनासाठी पर्यटक रत्नागिरीची निवड करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात कुठून कसे येता येते, याची माहिती या लेखात घेऊ या.

पुणे व मुंबईकडून रत्नागिरीत येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या बसेस आहेत. तसेच खासगी बससेवाही उपलब्ध आहे. 

पुण्यातून रत्नागिरीत येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मुळशीमार्गे ताम्हिणी घाटातून आल्यास रत्नागिरीच्या उत्तर टोकाकडे म्हणजे मंडणगड, दापोलीमध्ये येता येते. तिथून खेडला येता येते. दापोलीतून सागरी महामार्गानेही रत्नागिरीत येता येते. भोरमार्गे वरंधा घाटातून, तसेच वाई-महाबळेश्वरमार्गे पोलादपूर घाटातून आल्यास खेडमध्ये येता येते. सातारा-पाटण मार्गे कुंभार्ली घाटातून उतरून चिपळूणला येता येते. चिपळूण किंवा खेडला आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाने रत्नागिरीत येता येते. या मार्गांवरही अनेक पर्यटनस्थळे आहेत. पुण्यातून रत्नागिरीचे अंतर सुमारे ३०० किलोमीटर आहे.

मुंबईवरून मुंबई-गोवा महामार्गाने पनवेल, वडखळ, माणगाव, खेड, परशुराम, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या मार्गाने रत्नागिरीत येता येते. हे अंतर सुमारे ३५० किलोमीटर आहे. 

गोव्याकडून यायचे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, खारेपाटण, तळेरे ही छोटी शहरे ओलांडून रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात येता येते. तसेच पुढे येऊन लांजा तालुक्यानंतर रत्नागिरी तालुला लागतो. हे अंतर सुमारे २४० किलोमीटर आहे.

कोल्हापूरवरून रत्नागिरी हे अंतर केवळ १३० किलोमीटर असून, या मार्गावरही एसटी बसेसची सेवा उपलब्ध आहे.
कोकण रेल्वे हादेखील रत्नागिरीत येण्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. पनवेल-रोह्यापासून हा मार्ग कोकणात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, राजापूर रोड ही रेल्वेस्थानके या मार्गावर आहेत. कोकण रेल्वेमार्गाने प्रवास म्हणजे पर्यटनाचा मनमुराद आनंद. आता पुण्याहून सुटणारी एर्नाकुलम गाडीही आठवड्यातून दोनदा कोकण रेल्वेमार्गावरून जाते. त्यामुळे पुणेकरांनाही हा पर्याय उपलब्ध झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला जवळ असलेले विमानतळ म्हणजे मुंबई आणि गोवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले असून, लवकरच तो वाहतुकीला खुला होणार आहे. तसेच, नजीकच्या भविष्यात ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीतील विमानतळही कार्यान्वित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे हवाईमार्गेही कोकणात येणे सोपे होणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZZICG
Similar Posts
प्रवासाचे योग...! पुस्तकी ज्ञानापेक्षा भटकंती आपल्याला खूप शिकवून जाते; पण प्रवासाचेसुद्धा योग असावे लागतात. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत त्यांच्या आयुष्यातील प्रवासाच्या योगांबद्दल...
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
रत्नागिरीत ३० जानेवारीला पर्यटन परिषद रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याची हेतूने रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी चार या वेळेत पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी,
‘थर्टी फर्स्ट’ला या रत्नागिरीच्या सुंदर समुद्रकिनारी... रत्नागिरी : सरत्या वर्षाची शेवटची सायंकाळ आणि नव्या वर्षाची पहिली पहाट संस्मरणीय असावी, या दृष्टीने पर्यटक वेगवेगळ्या जागांच्या शोधात असतात. अशा जागांमध्ये समुद्रकिनारे पर्यटकांच्या सर्वांत आवडीचे असतात. रत्नागिरीतील पांढरा समुद्र त्यापैकीच एक आहे. या समुद्रकिनाऱ्याचा परिसर सध्या कात टाकत असून, स्कूबा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language