मुंबई : भारतातील सर्वात मोठी वॉटर हीटिंग सोल्यूशन्स पुरवठादार रेकोल्डने ‘सुपरब्रँड्स’ हा पुरस्कार जिंकत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. ऑनलाइन ग्राहक मतदान प्रक्रियेनंतर सुपरब्रँड म्हणून निवडला गेलेला रेकोल्ड हा वॉटर हीटिंग विभागातला एकमेव ब्रँड आहे. हा पुरस्कार आपल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या ब्रँड्सनाच दिला जातो.
याबाबत बोलताना अरिस्टन थर्मो इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मोहित नरूला म्हणाले, ‘भारताचा सुपरब्रँड म्हणून दखल घेतली जाणे आणि गुणवत्तेसाठी वैश्विक पातळीवर सर्वात आदरणीय असलेला पुरस्कार मिळवणे ही सन्मान आणि अभिमानाची बाब आहे. यातून ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादन बनवण्यासाठीची आमची बांधिलकी व त्यादृष्टीने केले जाणारे सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित झाले आहेत. या सन्मानाचे श्रेय आमच्या संपूर्ण टीमचे आहे, कारण त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते.’
अरिस्टन थर्मो समूहाचे भारतीय उपखंडातील विपणन आणि ई- कॉमर्स विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत धर म्हणाले, ‘हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणे ही अतिशय विलक्षण कामगिरी आहे. ‘सुपरब्रँड’ हे शीर्षक ग्राहकांना सातत्याने योग्य मूल्य देण्याच्या आणि नाविन्यपूर्ण गोष्टी तयार करण्याच्या आमच्या क्षमतेवर झालेले शिक्कामोर्तब आहे.’
सुपर ब्रँड्स ही ८६ देशांत कार्यरत असलेली जागतिक संस्था असून, ती प्रत्येक देशातील सर्वोत्तम ब्रँड ओळखण्यासाठी, त्याचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित आहे.