Ad will apear here
Next
‘मंत्रालय आणि राजभवनातही सार्वजनिक पार्किंग सुरू करावे’
ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत मागणी
मुंबई : ‘शहरातील भयावह ट्रॅफिक जाम व अडचणीच्या पार्किंग समस्येवर उपाय करण्यासाठी मुंबईमध्ये सरकारला मंत्रालय व राजभवनसहित सर्व सरकारी ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सुविधा सुरू केली पाहिजे,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली आहे. मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी वेगळे मंत्रालयही स्थापन केले जावे.

विधानसभेमध्ये सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर ‘अर्धा तास चर्चेचा’अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील पार्किंग समस्या, ट्रॅफिक जाम आणि मूलभूत सुविधांच्या विकासाविषयी आपला प्रस्ताव ठेवत आमदार लोढा म्हणाले, ‘मुख्यमंत्री मुंबई व महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय पारदर्शितेसह व वेगाने कार्यरत आहेत. मेट्रोचे काम वेगाने होत आहे; परंतु गाड्यांसाठी रस्त्यांवर जागा नसूनही रोज हजारो नवीन वाहनांची नोंदणी होत आहे. परिणामी अनेक तास ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडणे अशी या शहराची सर्वांत मोठी ओळख बनली आहे.’

मंगल प्रभात लोढाफुटपाथवर पायी चालणाऱ्यांसाठी कुठेच जागा नाही याचा उल्लेख करून आमदार लोढा यांनी मुंबईतून जितका कर वसूल केला जातो, त्यातील फार थोडा मुंबईसाठी वापरला जात असल्याचे नमूद केले. ‘दीर्घ काळापासून प्रलंबित हाजी अली सर्कलवर फ्लायओव्हरचे काम करून बाणगंगावरून रॉकी हिलकडे जाणाऱ्या रस्त्याला तातडीने सुरू करण्याची मागणीही लोढा यांनी केली आहे.

‘मुंबईमधील पायाभूत सुविधांचा आराखडा बनवणाऱ्या नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या नावे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची फाइलही सरकारी विभागामध्ये अडकून पडली आहे आणि त्याहून अधिक दुर्लक्ष योजनांकडे केले जाऊ शकत नाही. मुंबईला वाचवण्यासाठी तत्काळ उपाय केले जावेत. मुंबईच्या सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय बनवले, तर फक्त मुंबई शहरच नाही, तर राज्याचा विकासही अधिक वेगाने होईल,’ असे लोढा यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZKPBU
Similar Posts
‘भाजप’च्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये महाराष्ट्राचे सहा जण मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जय्यत तयारी सुरू केली असून, वेगवेगळ्या मुख्य कामांसाठी महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. यांमध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, मंगल प्रभात लोढा आणि विनय सहस्रबुद्धे या सहा जणांचा समावेश आहे
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
‘मुख्यमंत्री सचिवालयातील आदरातिथ्यावरील खर्च पूर्वीसारखाच’ मुंबई : ‘मुख्यमंत्री सचिवालयात आदरातिथ्यावर केलेल्या दरवर्षीच्या खर्चाची आकडेवारी पाहिली, तर ही सरासरी आधीच्या सरकराच्या कार्यकाळात होती तशीच आहे. असे असताना काँग्रेसचे बेताल नेते संजय निरूपम हे बरळतात आणि त्याचीच री महाराष्ट्रातील ‘जाणते’ नेतृत्त्व म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते सन्माननीय शरद पवारही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language