Ad will apear here
Next
छत्रपती शिवाजी अँड सुराज्य
शिवाजी महाराजांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जाते. रयतेसाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. कुशल प्रशासक व यशस्वी शासक असलेल्या शिवाजी महाराजांनी सुशासनाच्या पायावर समाजाची उभारणी केली. हे करताना ते कसे विचार करीत, कसा निर्णय घेत, त्यांच्या राज्यकारभाराची शैली आदी गोष्टींचा विचार करून त्यासंबंधीचे मार्गदर्शन अनिल माधव दवे यांनी ‘छत्रपती शिवाजी अँड सुराज्य’ या पुस्तकामधून केले आहे. त्या काळातील परदेशांतील राजे व विद्वानांच्या मनातील शिवरायांची प्रतिमा, त्यांची स्वराज्याची संकल्पना, अचूक आकलन व निर्णयक्षमता, सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा गुण, निर्भयता आदी बाबींवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रमुख मंत्रालये, वने व पर्यावरण, महिला सबलीकरण, अल्पसंख्याक स्व-प्रेरित राज्यरचना या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडताना दूरदृष्टी व राजकीय वाटचाल, योजकता आणि कार्यान्वयन क्षमता, अष्टप्रधान यावरही पुस्तकात भर देण्यात आला आहे. समर्थ आणि दुर्बळ शासन आणि शासक यांची लक्षणेही यात दिली आहेत.

पुस्तक : छत्रपती शिवाजी अँड सुराज्य
लेखक : अनिल माधव दवे
प्रकाशक : हिंदुस्थान प्रकाशन संस्था
पृष्ठे : २३०
मूल्य : ५०० रुपये

(‘छत्रपती शिवाजी अँड सुराज्य’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZTQCD
Similar Posts
छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना लिहितात – ‘श्री सद्गुरुवर्य श्री सकलतीर्थरूप...’ समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते, यावरून काही काळापूर्वी विनाकारण उलटसुलट चर्चा सुरू करून संभ्रम निर्माण करण्यात येत होता. शिवाजी महाराज मात्र रामदास स्वामींना गुरुस्थानी मानत होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पुरावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना १५ ऑक्टोबर १६७८ रोजी लिहिलेले पत्र
सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन पुणे : मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटानंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. नुकतेच पाच शेतकऱ्यांच्या हस्ते किल्ले रायगडावर या चित्रपटाच्या संहितेचे पूजन करण्यात आले.
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र ‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाणक्याच्या नावाची चर्चा होते; पण प्रत्यक्षात चाणक्याची
मुरुड येथे पद्मदुर्गपूजन सोहळा उत्साहात मुरुड : कोकण कडा मित्रमंडळ, पद्मदुर्ग जागर समिती आणि मुरुड-जंजिरा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पद्मदुर्ग किल्ल्यावर २५ डिसेंबर २०१८ रोजी पद्मदुर्ग जागर हा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात पार पडला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language