Ad will apear here
Next
सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध
‘माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे,’ असे भगवान बुद्ध यांनी म्हटले आहे. या नव्या धम्मातून बुद्धांनी सामाजिक क्रांतीचे काम केले. बुद्ध, बुद्धविचार व बुद्धांचे कार्य याचा परिचय डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकातून करून दिला आहे. याच पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी वाचकांसमोर ठेवली आहे. यात सिद्धार्थाच्या जन्माची कथा, गोतम या नावाची उकल, बुद्धत्वप्राप्ती म्हणजे काय, तथागत, भगवान, सुगत, श्रवण या शब्दांचे अर्थ, गोतमाच्या गृहत्यागामागील कारणे, चार अरिय सत्ये, आत्मा, कर्म, पुनर्जन्म, भिक्खू संघाची निर्मिती, यशोधरा यांचा त्याग, वज्जींचा उपदेश, कालामसूक्तमधील उपदेश, बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, बुद्धांवरील आक्षेप, तिपिटकातील प्रक्षिप्त सुत्ते, मिथकांची वस्तुनिष्ठ उकल, दैवी चमत्कार व कर्मकांडापासून बुद्ध तत्त्वज्ञानाची सुटका अशा अनेक विषयांवरील भाष्य या पुस्तकात आहे.

पुस्तक : सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे
प्रकाशन : लोकायत प्रकाशन
पृष्ठे : २४०
मूल्य : २५० रुपये

(‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZPGCB
 He struggled against :
Ritualistic religion , and monopoly of knowledge .
Were his philosophical thoughts different from those in the
established religion ?
 People praise him , glorify him . Does anybody read his writings ?
How many can ? In the original ? The language is different , the
script is different . And , more important , how many are
interested in philosophy ?
Similar Posts
सुखी माणसांचा देश भूतान आनंदी माणसांचा देश अशी भूतानची जगात ओळख आहे. त्याचे गमक भूतानच्या ‘सकल राष्ट्रीय समाधान’ (जीएनएच) नीतीमध्ये असल्याची माहिती देत प्रभाकर ढगे यांनी ‘सुखी माणसांचा देश भूतान’मधून या देशाचा परिचय करून दिला आहे.
‘अडचणींचे बुजगावणे करू नका’ पुणे : ‘प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि चिकित्सक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. खेड्यापाड्यांतील मुला-मुलींमध्ये उत्तम प्रतिभा, बुद्धिमत्ता आहे; पण मोठ्या यशात त्याचं रूपांतर करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती हवी. सबबी सांगून चालणार नाही. अडचणींचे बुजगावणे करू नका,’ असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक डॉ
तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान विवेक, करुणा व ज्ञानाने लोककल्याणाच्या ध्येयाने गौतम बुद्धांनी राजवैभवाचा त्याग केला. तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद देत माणसातील स्वत्व जागे केले. मानवाचा पशुत्वाचा मुखवटा काढून मनुष्यत्वाचा ‘चेहरा’ देण्याचा प्रयत्न बुद्धांनी केला. त्यानंतर हजारो वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आपलेसे
छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य मुघल व निजामशाहीच्या दक्षिणेकडील संघर्षात निजामाने एतद्देशीय मराठ्यांना हाताशी धरून आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला. यातूनच मराठ्यांचा लष्करी विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला. या विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज, असा इतिहासाचा दाखला देत डॉ. नीरज साळुंखे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language