Ad will apear here
Next
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ
बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांचे धाकटे चुलतबंधू व त्यांना कायम साथ दिलेले सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब यांची आठवण फक्त एकाच घटनेवरून येते ती म्हणजे पानिपतची लढाई. हि लढाई 'भाऊं'मुळे मराठे हरले असा समज आजही आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सांगत कौस्तुभ कस्तुरे यांनी 'सकलराजकार्यधुरंदर सदाशिवरावभाऊ' या पुस्तकातून त्यांचे चरित्र वाचकांसमोर आणले आहे.

पराक्रमी, पारदर्शी कारभार, स्वच्छ चारित्र्य, नीडर व सरळ स्वभाव, शौर्य, चिकाटी, बुद्धी, व रणनीतीतील चातुर्य अशा गुणसंपन्न भाऊंशिवाय नानासाहेबांचे पान हलत नसत. लहानपणीच मातृपितृसुखाला हरपलेल्या भाउंचा सांभाळ पेशवे घराण्यातील स्त्रिया व पुरुषांनी केला.

वयाच्या सोळाव्या वर्षांपासून त्यांनी तलवार हाती धरली. भाऊसाहेबांच्या पहिल्या सावनुर मोहिमेपासून ते पानिपतपर्यंतच्या त्यांच्या मोहिमा, त्यांची राजकारणे, मनःस्थिती यावर पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. अनेक संदर्भ देत सदाशिवरावभाऊंच्या जीवनतील विविध घटनांचा उल्लेख यात केला आहे. मराठेशाहीच्या सुवर्णमयी इतिहासात दडलेले सदाशिवरावभाऊ यांचे विविध पैलू यात उलगडले आहे. 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZTIBD
Similar Posts
शिवराम   छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे. त्यांचे कार्यकर्तुत्व व गुण आजही आदर्श ठरतात. परकीयांच्या राज्यात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवरायांनी पाहिले आणि ते साध्यही केले. हाच धागा अॅड. दादासाहेब राजेशिर्के यांना डॉ. रामचंद्र महाराज पारनेकर यांच्या कार्यात आढळला. त्यातून
असा हा राजहंस 'राजहंस' नावातच एक अदब, ऐश्वर्य जाणवते. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी या नावाचे सार्थक केले. संगीत नाट्यभूमीवर त्यांनी इतिहास रचला. मात्र या राजहंसला साथ देणारा दुसरा एक राजहंस होता, हे कित्येकांना माहिती नाही. बालगंधर्वांवर अपारंपार प्रेम करणारे त्यांचे कनिष्ठ बंधू म्हणजे व्यंकटेश श्रीपाद
मधुमेह विरुद्ध आपण मधुमेह म्हणजेच डायबेटीसची रुग्णसंख्या भारतात सातत्याने वाढत आहे. मधुमेह हा हृदयरोगासारख्या अन्य आजारांनाही निमंत्रण देत असतो. म्हणून हा आजार टाळणे आवश्यक असते. आहार व जीवनशैलीतील बदलांमुळे ते शक्य होते. याविषयीची माहिती डॉ. अश्विन सावंत यांनी 'मधुमेह विरुद्ध आपण' या पुस्तकातून दिली आहे. भारतातील अतिपोषण
मनाच्या मध्यरात्री लेखक प्रवीण दवणे यांच्या या वेगळ्या धाटणीच्या कथा. मनाच्या मध्यरात्री ही पहिलीच कथा एक लेखकाची आहे. 'लिहून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्नातून लिहिणं होतं,' असा लेखकालाच धडा देणारी नायिका येथे भेटते. प्रश्नांच्या गर्तेत सापडलेला 'प्रश्नडोह'मधील मिलिंद, 'संन्यासातही अजून संसाराचे तंतू शोधीत स्वतःला चकवीत आत्मशोध

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language