Ad will apear here
Next
पाहावे आपणासी आपण
माणूस जसा मोठा होत जातो, काळ पुढे सरकत राहतो, तसे आयुष्य उलगडत जाते, समजत जाते. चांगल्या-वाईट काळात साथ देणारे विचारच माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. अनेकदा साधे विचारही जीवन व्यापून टाकतात, असे सांगत प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘पाहावे आपणासी आपण’ या पुस्तकातून युवक, विद्यार्थी, पालक, गृहिणी अशा सर्व वयोगटांतील वाचकांना प्रेरणा देणारी दिशा दाखवली आहे. व्यवस्थापन कसे करावे, याचे मर्म त्यांनी या पुस्तकाद्वारे उलगडले आहे. यातील लेख छोटेखानीच आहेत; पण ते मोठ्या जीवन आशयाकडे जाण्याच्या दिशा सूचित करणारे आहेत. श्रद्धा, अनुभव, आशावाद, एकांत, हास्ययोग, वक्तृत्वकला, खेळ स्मृतींचा, मी ओमकार स्वरूप, आध्यात्मिक एकारलेपण, साधेपणा, मनाचे व्यवस्थापन, वारी आणि जीवन, दिवाळी अशा विविध विषयांवरील हे लेख आहेत; मात्र जगण्याचा यथार्थ बोध करून देणे आणि जीवननिष्ठा बळकट करणे, हे एक सूत्र त्यांत आहे.

पुस्तक : पाहावे आपणासी आपण
लेखक : प्रा. मिलिंद जोशी
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाउस
पृष्ठे : १४१
मूल्य : १९९ रुपये

(‘पाहावे आपणासी आपण’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZRECB
Similar Posts
गौर गोपाल दास यांच्या ‘जीवन समजून घेताना’ पुस्तकाचे २६ मे रोजी प्रकाशन पुणे : आध्यात्मिक गुरू आणि प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी लिहिलेले ‘जीवन समजून घेताना’ हे पुस्तक मंजुल पब्लिशिंग हाउसतर्फे प्रकाशित होत असून, राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे. रविवारी (२६ मे २०१९) सायंकाळी सहा वाजता पुण्यातील कँपमधील
जीवन समजून घेताना आपले वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान या जीवनाच्या चार महत्त्वाच्या भागांमध्ये समतोल साधता आल पाहिजे, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे. यानुसार ‘जीवन समजून घेताना...’ मधून मन:शांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य त्यांनी उघड केले आहे.
टेस्टी हेल्दी रेसिपीज ‘टेस्टी हेल्दी रेसिपीज’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language