Ad will apear here
Next
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीच्या बैठकीत सहभागी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारीपालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण वसई, पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड तालुक्यात, तसेच पालघर, डहाणू नगरपालिका आणि संपूर्ण वसई, विरार महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. निवडलेल्या सर्व लाभार्थ्यांना (गरोदर माता, दोन वर्षांखालील बालके व गंभीर रुग्ण वगळून) वयोगटानुसार डीईसी गोळ्यांची एक मात्रा द्यायची आहे.
प्रत्येक ठिकाणी गोळ्यावाटप करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या समक्ष सर्वांनी औषधोपचार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी केले. तसेच या मोहिमेत सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन हा औषधोपचार घेण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी केले.

हत्तीरोग ही एक जागतिक समस्या आहे. जगातील ८० देशांतील १२ कोटींपेक्षा जास्त जणांना या रोगाची लागण झाली आहे. त्यापैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आढळतात. हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, आदी रोगांप्रमाणे हत्तीरोगाचा उद्रेक होत नाही अथवा त्यामुळे मृत्यू होत नाहीत. परंतु या रोगामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होतात.

हत्तीरोगबाधित माणसाच्या शरीरातील प्रौढ हत्तीरोग परजीवी लाखोंच्या संख्येने मायक्रोफायलेरियांना जन्म देतात. हे मायक्रोफायलेरिया रक्ताभिसरणाद्वारे रक्तामध्ये पसरतात. क्युकिफेसियटस डास हत्तीरोगबाधित व्यक्तीला चावतो. त्या वेळी बाधित माणसांच्या शरीरातील मायक्रोफायलेरिया डासांच्या सोंडेद्वारे त्याच्या शरीरात प्रवेश करतात. डासांच्या शरीरात साधारणतः १२ दिवसांत दूषित अळ्या तयार होतात. हे डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीला हत्तीरोगाची  बाधा होते. बाधित व्यक्तीमध्ये ताप किंवा तत्सम लक्षणे आदळतात.

यावर डीईसी व अल्बेंडेझोल ४०० एमजी ही दोन्ही औषधे पूर्णतः सुरक्षित आहेत. डीईसी गोळ्या मायक्रोफायलेरियाचा नाश करतात, तर अल्बेंडेझोल ४०० एमजी गोळी आतड्यातील कृमींचा नाश करते. दोन्ही गोळ्यांचे एकाच वेळी सेवन केले, तर प्रौढ जंतूंचा नाश होऊन हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होईल; मात्र डीईसी व अल्बेंडेझोल ४०० एमजी ही दोन्ही औषधे उपाशीपोटी देऊ नयेत, अशी सूचना या वेळी देण्यात आली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZEPBE
Similar Posts
कुपोषण निर्मूलनाबाबत कीर्तनकारांची कार्यशाळा वाडा (पालघर) : ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडा दोन’ यांच्यामार्फत वाडा तालुक्यातील ६० कीर्तनकार/ प्रवचनकार यांची कुपोषण निर्मूलनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला पालघर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पंचायत समिती सभापती नडगे मॅडम, उपसभापती पाटील. जिल्हा परिषद सदस्य
पालघर जिल्ह्यात होणार शाळांचे समायोजन पालघर : सहअध्ययनाने शैक्षणिक गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होते. पालघर जिल्ह्यामध्ये पायाभूत पदांनुसार ६६५ पदे रिक्त असल्याने दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शाळा समायोजित केल्यास त्यामधील अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेऊन, शिक्षकांचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत होणार आहे
नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची जव्हार तालुका भेट नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सहा जुलै रोजी पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील स्वयंसहायता गटांना, ग्रामसंघांना व विविध उपजीविका कार्यक्रमांना भेट दिली. ‘उमेद’ या राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आले आहेत.
पालघर जिल्हा परिषदेत कॉफी विथ सीईओ पालघर : पालघर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या दालनात ‘कॉफी विथ सीईओ’ हा कार्यक्रम नुकताच झाला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त करण्यात सहकार्य करणाऱ्या व उलेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमांतर्गत मेडल देऊन गौरविण्यात येते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language