
महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.
शिवाजी महाराज यांच्या कुळापासून सुरुवात होत त्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची ओळख, त्यांचे पुत्र व शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचा पराक्रम, शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांचे शिक्षण, महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापनेची सिद्धता व आरंभ आदी प्रकरणांमधून शिवरायांची स्वराज्ये स्वप्नपूर्तीकडे सुरू झालेली वाटचाल समजते. पुढे स्वसत्तावृद्धी करताना त्यांच्या मोहिमांचा वृत्तांत दिला आहे.
शिवरायांचे मोगलांशी संबंध स्पष्ट करताना विजापूरकरांचा मुलुख काबीज करणे, अफझल खानाचा वध, मोगलांच्या राज्यातील स्वाऱ्या, सुरत व अन्य शहरांची लूट, मिर्झाराजे जयसिंग यांची स्वारी, आग्रा भेटीत व सुटका, स्वदेशी परतल्यावर केलेला पराक्रम, राज्याभिषेकाने स्वराज्यस्थापनेची पूर्ती व राज्यव्यवस्था, महाराजांचा अंतकाळ येथपर्यंतचे शिवचरित्र यात वाचायला मिळते.
पुस्तक : छत्रपती शिवाजी महाराज
लेखक : कृष्णराव अर्जुन केळूसकर
प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : ६६४
किंमत : ४५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)