Ad will apear here
Next
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद
अभिषेक देशपांडे

पुणे : इटलीतील सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महोत्सवात पुण्याच्या अभिषेक देशपांडेने सात गुणांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत ‘ब’ गटात खेळताना अभिषेक देशपांडेने नऊ डावांत सात गुण मिळवले. गुणांची बरोबरी झाल्याने अभिषेकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत अभिषेकने अग्रमानांकित फिडे मास्टर व्हॅलन्टी व जाइल्स (फ्रान्स) या अनुभवी खेळाडूंवर मात केली. 

महत्त्वाच्या डावांमध्ये अभिषेकने अॅलबिनी फेडरिको व माँड्युकी मिरको यांच्यावर विजय नोंदवत आगेकूच केली होती. सात गुणांसह त्याने उपविजेतेपद संपादन केले. इटलीतील दुसऱ्या क्वीन ऑफ कॅटोलिका बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेकने आठवे स्थान मिळवले. तसेच त्याने फिडे मास्टर पालोझ्झा ख्रिस्तियन, व्ही. अॅटिंनो यांना पराभूत केले. या कामगिरीमुळे त्याने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला. 


जर्मनीतील खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेने सहावे स्थान मिळवले होते. या स्पर्धेत तो ग्रँडमास्टरच्या गटात खेळला होता. या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रियाच्या स्पाइसबर्गर गेहार्ड व युक्रेनच्या केमेनस्की डिमॅट्रो यांना नमवले होते. अभिषेकच्या या विजयाबद्दल सन्मानचिन्ह देऊन त्याला गौरविण्यात आले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZSVCC
Similar Posts
रोमचा अग्निप्रलय इसवी सनाच्या पहिल्या शतकात, १९ जुलै ६४ रोजी अज्ञात कारणामुळे इटलीतील रोममध्ये आग भडकते. संपूर्ण शहर बेचिराख करूनच ती शांत होते. एकीकडे राजधानी जळत आहे आणि त्या देशाचा सम्राट नीरो मजेत फिडल वाजवत बसला आहे, ही कथा आपण ऐकून आहोत; पण प्रत्यक्षात तिथं नेमकं काय घडलं होतं?... जाणून घेऊ या ज्येष्ठ लेखक रवींद्र
महेश नामपूरकर यांना मानाचे ‘ए डिझाईन अॅवॉर्ड’ पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर व वास्तुविशारद महेश नामपूरकर यांना डिझाइन क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा ‘ए डिझाइन अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. इटलीमधील कोमो येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात महेश नामपूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगविख्यात मायकल एंजेलोला अनोखे अभिवादन पुणे : जगप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार मायकल एंजेलोच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी, नऊ मार्च २०१९ रोजी तब्बल शंभर चित्रकार, शिल्पकार एकत्र येऊन व्यक्तिचित्रण करणार आहेत. पोट्रेट आर्टीस्ट्स ग्रुप व भांडारकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिनिनफरिना बॅटिस्टा- जगातील पहिली इलेक्ट्रिक लक्झरी कार सादर जीनिव्हा : जगातील पहिली संपूर्णपणे इलेक्ट्रिक लक्झरी कार ‘जीनिव्हा ऑटो शो’मध्ये सादर करण्यात आली. जीनिव्हातील हायपरकारच्या वर्ल्ड प्रीमिअरमध्ये बॅटिस्टाची तीन सुंदर मॉडेल सादर करण्यात आली असून, इलेक्ट्रिक कार कशी असावी, याचा नवा आदर्श आहेत. इटलीतील पिनिनफरिना बॅटिस्टा या नामांकित कंपनीने या अत्यंत देखण्या आणि पर्यावरणपूरक कारची निर्मिती केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language