‘चित्रपटाची गीते, छायाचित्रे यांचा संग्रह करणे सोपे नाही. प्रत्येक गोष्ट लिहून जपून ठेवणे हा ध्यास आहे. गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे.’ असे मत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी कोथरूडच्या ‘सिनेप्रेमी ग्रुप’तर्फे आयोजित कार्यक्रमात बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केले.
पुस्तकाचे प्रकाशन आणि ई-बुक अनावरण ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांच्या हस्ते झाले. त्यासोबत या सोहळ्यात ३५ ते ४० हजार ओरिजिनल छायाचित्रांचा संग्रह असणारे ज्येष्ठ चित्रपट संग्राहक जफर आबिद, लेखक पद्माकर पाठकजी, बुकगंगाचे प्रतिनिधी कुमार देवणे, सिनेप्रेमी ग्रुपचे अप्पा देशपांडे आणि सागर अत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील पोरे यांनी केले.

बुकगंगा.कॉम वरून ‘सुनहरे गीत’ याचे प्रिंट पुस्तक आणि ई-बुक विकत घेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-