भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लाल-बाल-पाल या त्रयींतील लाला लजपतराय यांचा आज (२८ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना आदरांजली!
पंजाबमध्ये १८६५मध्ये जन्मलेले लाला त्यांची तेजस्वी वाणी व ओजस्वी विचार यामुळे देशभर ‘पंजाब केसरी’ म्हणून ख्यातनाम झाले. त्यांनी आर्य समाजाच्या कार्यातही बहुमोल भर घातली.
याच काळात महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व बंगालात बंकिमचंद्र पाल हेही जनजागृतीचे कार्य करत होते. ही त्रयी ‘लाल बाल पाल’ म्हणून प्रसिद्ध झाली.
१९२८मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन कमिशनची नेमणूक केली. कमिशनला काँग्रेसने विरोध केला. देशभर निदर्शने सुरू झाली. लाहोरमध्ये लालांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केला. लालाही जखमी झाले.
छातीवर लाठ्यांचा मार लागल्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लालांचे निधन झाले. पंजाब केसरींना हौतात्म्य आले.
- भारतकुमार राऊत